Wednesday, October 27, 2010

ठाक-यांच्या भांडणाचा लाभ कोणाला ?

कल्याण-डोंबीवली महानगरपालीकेची निवडणूकीत शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत, त्यांच्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. शिवसेनेने शिवाजी पार्कवरीय सभा शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थीत घेतली, त्यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबीवली त घेतलेल्या सभालाही मोठ्या संख्येने कल्याण-डोंबीवली करांनी उपस्थीती लावली. तेथील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर व त्यातली त्यात शिवसेनाप्रमुखांवर ज्या पध्द्तीने आरोप केले त्याने मात्र शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. त्याला  शिवसेनाप्रमुखांनी सामना मध्ये ठाकरी शैलीने ज्या पध्द्तीने प्रत्युत्तर दिले ते पाहुन हे मतभेद वाढतील अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणात कॉग्रेस मात्र आपला फायदा करुन घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. मनसे ने उत्तर भारतीयांविरोधात केलेले आंदोलन, मागील ४५ वर्षापासुन मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेनेने तयार केले वातावरण याला दोघातील अंतर्गत भांडणामुळे छेद जाईल आणि मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होवुन शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनाही त्याचा फटका बसेल. राष्ट्र्वादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्रीय कॉग्रेस हेही या निवडणूकीत आपल्या पुर्ण सामर्थ्यानिशी या निवड्णूकीत उअरले आहेत आणि त्यांना या  निवड्णूकीत नक्कीच चांगले यश मिळेल अशी चिन्हे आहेत. काय होईल ते येणारा काळच ठरवेल.  

Tuesday, October 26, 2010

ठाण्यातील ठाकरी भांडण...

ठाण्यात ठाक-यांचा
ठाक-यांशी सामना रंगला
नात्यात शिल्लक राहीलेला एक धागा
त्यांच्या बोलण्याने भंगला
सत्ता येतील आणि जातील
टिका करुन नाती टिकतील का हो
राजकीय बाजारात मग ते
मराठी माणसाची स्वप्न विकतील का हो
भांडण लावले ज्यांनी
ते गालातल्या गालात हसतील
दोघांचीही कशी जीरली म्हणत
हा तमाशा बघत बसतील

Friday, October 22, 2010

घराणेशाही

राजकारणातील घराणेशाही
आता सगळीकडेच शिरली
लायकीपेक्षा नातीच मग
महत्वाची ठरली
डॉक्टर चा मुलगा 
डॉक्टर होतो
शिक्षकाचा शिक्षक
मग आम्हीच का करु नये
अशी पुस्तीही त्यांनी जोडली
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
सर्वच पक्षात घराणेशाही मुरली आहे
राजकारणातील ही गोष्ट नवी नाही
महाभारतातील ध्रुतराष्ट्रापासुनच
ती राजकारणात शिरली आहे...

Wednesday, October 20, 2010

राष्ट्रकूल स्पर्धेतील शायनींग "सायना"



राष्ट्रकूल स्पर्धेत भारताने तब्बल ३८ सुवर्णपदकासह १०१ पदके जिंकुन दुसरे स्थान पटकावत ईग्लंडला मागे टाकले. राष्ट्रकूल स्पर्धा सुरु होण्याच्या अगोदर १ महिना गाजत होती ती भ्रष्ट्राचारच्या व निकृष्ट दर्जाच्या कामाच्या चर्चेमुळे, परतू त्यानंतरही स्पर्धा मात्र यशस्वीपणे व दिमाखात पार पडली.स्पर्धेच्या संयोजनाविषयी जगभरातुन समाधान व्यक्त झाले. राष्ट्रकूल स्पर्धेत पदके मिळवणा-या सर्वांनीच भारताची शान जगभरात वाढवली.सर्वांचेच भारतीयांनी मनापासुन अभिनंदन केले.
राष्ट्रकूसल स्पर्धेत वैयक्तीक क्रिडाप्रकारामध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगीरी केली, त्यामध्ये बॅडमिंटन मध्ये सायना नेहवालची शायनींग कामगीरी लक्षवेधक ठरली कायम स्मरणात राहण्यासारखी झाली. सायना मागील दोन वर्षापासुन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने चमकत आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत सायनाने अटीतटीच्या झालेल्या अंतीम सामन्यात मलेशीयन बॅडमिंटन पटूचा पराभव करुन सुवर्णपदक पटकावले. अंतीम सामन्यात सायनाने पहीला सेट गमावल्यानंतर ज्या आत्मविश्वासाने नंतरचे दोनही सेट जिंकले तीची ती जिगर वाखानण्याजोगी होती. बॅडमिंटन सारख्या वैयक्तीक खेळामध्ये आपले करीअर करु ईच्छीना-या बॅडमिंटन पटूंना सायनाचा आदर्श घ्यावा लागेल, आता ऑलींपीक मध्ये सुवर्णपदक पटकावुन सायना नेहवालने भारताची सुवर्णपदकाची भुक संपवावी तरच तीची कामगिरी आणखी शायनींग ठरेल.

Wednesday, October 13, 2010

क्रिडा क्षेत्र होवु शकते का करिअर ?


प्रत्येक पालकाला वाटते आपल्या पाल्याने काहीतरी वेगळ करावं, वेगळा मार्ग निवडावा, एखाद्या क्षेत्रात नांव कमवावे आणि त्यासाठी त्यांची  अव्याहत धडपड चालु असते. काहींना क्रिडा क्षेत्रात मुलाने नांव कमवावे वाटते परंतु त्यातील बहुतांशी जनांचे आपला मुलगा क्रिकेटर व्हावा हेच स्वप्न असते कारण इतर क्रिडा प्रकारांपेक्षा क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंना मिळणारे मोठे ग्लॅमर मिळते, प्रचंड प्रमणात मिळणारा पैसा मिळतो. खुप प्रयत्न करुनही भारतीय संघांत स्थान मिळाले नाही तरी रणजी किंवा एखाद्या परदेशी क्लबशी करार करुन करिअर करता येते, नव्यानेच सुरु झालेल्या आय.पी.एल. मुळे तर क्रिकेटमध्ये पैश्याचा पाउस पडत आहे आणि यामुळेच पालकांनी आपला मुलगा क्रिकेटपटूं व्हावा हे स्वप्न पहाणं स्वाभाविक आहे. क्रिकेटव्यतीरिक्त इतर क्रिडाप्रकारामध्ये करिअर करण्याबद्दल पालकांचाच काय मुलांचाही तितकासा ओढा दिसुन येत नाही.
    इतर क्रिडाप्रकारात विषेशत: वैयक्तीक क्रिडाप्रकारंमध्ये म्हणजे नेमबाजी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ति, बॉक्सींग, यामध्ये करिअर करायला खुप संधी आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या शारीरिक क्षमतेचा,त्याच्या खेळाविषयीच्या आवडीचा विचार करुन त्याला प्रोत्साहीत करावे, त्याला चांगला प्रशीक्षक मिळवून द्यावा, त्याने मेहनत घेतली तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणे शक्य होईल. आणि या क्रिडाप्रकारांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदक मिळवणे व हाच यशस्वीतेचा मुख्य निकष असतो आणि पदके मिळवण्यामधील सातत्यामुळे खेळाडूची कारकीर्द घडते युथ गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशीयन गेम्स, ऑलींपीक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधुन पदक मिळवल्याशिवाय खेळाडूंना राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त होत नाही. पदक मिळवणा-या खेळाडूंना मात्र काही प्रमाणात पैसा ही मिळतो आणि रेल्वे, सरकारी विमानकंपन्या, पोलीस खाते अशा ठिकाणी चांगली नोकरी मिळू शकते.
    इतर क्रिडाक्षेत्रात करिअरला खरोखरच वाव आहे परंतू त्यासाठी अपार मेहनत, मोठा खर्च याची निनांत आवशकता आहे. सरकारने (क्रिडा खात्याने) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर आपला एशीयन गेम्स, ऑलींपीक  मधील पदकांचा दुश्काळ संपेल. चालु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भालाफेकीत भारतीय महिला ८ व्या  व ९ व्या क्रमांकावर आल्या, त्यांनी परदेशी खेळाडूंचे फायबरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाले पाहुन केवळ उच्च दर्जाचे साहीत्य नसल्यामुळे आम्ही पदकापासुन वंचीत राहीलो अशा प्रतीक्रिया खेळाडूंकडून आल्या. तर सर्वच क्रिडा प्रकारामध्ये तयारीबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा साहीत्य ही अत्यंत आवश्यक आहे.
    आपले संपुर्ण आयष्य खेळासाठी खर्च घालणा-या अ‍ॅथलिट्स ना निवृत्ती घेतल्यानंतर फार हलाखीचे जीवन जगावे लागते, सरकार त्यांची जबाबदारी घेत नाही, अशा ब-याच कारणांमुळे क्रिडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे येत नाहीत.

Wednesday, October 6, 2010

पाकीस्तानी कलाकार बीग बॉसच काय कुठेच नकोत...

फक्त भारतव्देष हीच ज्यांची संस्कृती आहे त्यां पाकीस्तानी कलाकारांना भारतामध्ये  बोलवतात कशाला हा प्रश्न सध्या तमाम भारतीयांना पडलेला आहे. पाकीस्तानी कलाकारांना भारतात बोलावुन काही वाहीन्या देशविरोधी कारवाया करण्यात धन्यता का मानतात, त्यांना जाब विचारनारा या देशात कोणीच नाही का, संपर्ण भारतामध्ये भारतातील कोणत्याच कार्यक्रमामध्ये पाकीस्तानी कलाकारांना  सामील करुन घेवु नये या मताचा मी आणि समस्त देशप्रेमी मंडळी आहेत , बर ही पाकीस्तानी कलाकार मंडळी पाकीस्तानचा भारतव्देष संपवण्याचा कधीही प्रयत्न करताना दिसुन येत नाहीत. भारताविरुध्द कायम अतिरेकी कारवाया करणा-या, भारतात अशांतता माजवणा-या पाकीस्तानी नेत्यांची कानउघडनी करताना दिसत नाहीत मग त्यांना बोलावुन या वाहीन्या फक्त टीआरपी वाढवण्यासाठीच हा उपद्व्याप करतात असे समजायचे का. पाकीस्तानी कलाकारांना भारतामध्ये येवू न देण्याचा पवित्रा काही राजकीय पक्ष घेतात मात्र त्यांना सरकारकडून वा मतांच्या लाचारीसाठी लांगुलचालन करणारे राजकीय पक्ष विरोध करतात, उलट अशा पाकीस्तानी कलाकारांना खेळाडुंना संरक्षण पुरविण्यात ही मंडळी धन्यता मानतात आणि खेळामध्ये, कलेमध्ये राजकारण आणू नये असा दांभीकपणाही मिरवतात. पाकीस्तानी कलाकारांच्या विरोधात आंदोलन करणा-या पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खटले भरतात. हे सर्व भारतातील जनता मात्र निमुटपणे, त्रयस्थपणे पहात राहते.
जनतेने हे सारे त्रयस्थासारखे न पाहता याला आपल्यापरीने विरोध केला पाहीजे, अशा वाहींन्यांवर अशा कार्यक्रमांना पुरस्कृत करणा-या उत्पादनांवर बहीष्कार घातला पाहीजे , भारतविरोधी कारवाया करणा-या पाकीस्तानला, तेथील कलाकारांना, खेळाडुंना, राजकीय नेत्यांना भारतात प्रवेश नाकारलाच पाहीजे तरच "भारत माता की जय" सार्थ वाटेल.