Tuesday, November 30, 2010

बहुचर्चीत "जे.पी,सी." आणि नाकर्ते सरकार

देशात नुकत्याच उघड झालेल्या टु ती स्पेक्ट्र्म , कॉमन वेल्थ, आदर्श या महा आर्थीक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करावी या मागणीवर विरोधक लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यापासुन ठाम आहेत. रोज सुरु होणारी लोकसभा विरोधकांच्या गोंधळामुळे कोणत्याही कामकाजाविना स्थगीत करावी लागत आहे. या होत नसलेल्या कामकाजावर मात्र जनतेचे कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. यामध्ये सरकार मात्र सारे काही माहीत असुनही कोणताच निर्णय न घेता बघ्याची भुमीका घेत आहे. संसदेत कामकाज होवुन जनतेच्या विकासाची, नवनविन लोककल्याणकारी   कामे व्हावीत, नविन विधेयके सादर होवुन त्यावर चर्चा होवुन ती पारीत व्हावीत यासाठी संसदेचे अधिवेशन होत असते आणि विरोधकांनाही या अधिवेशनात सरकारला जाब विचारण्याचा संपुर्ण अधिकार आहे. सरकार विरोधकांची जेपीसी ची मागणी मान्य का करीत नाही हा कळीचा मुद्दा आहे. सरकारला यामध्ये भिती वाटण्याचे काय कारण आहे हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. . जे.पी,सी स्थापन केल्यानंतर  कदाचीत सरकारमधील काही नेत्यांची नावे उघड होतील व सरकारला ते अडचणीचे ठरेल अशी भिती सरकारला वाटत असावी आणि या अगतिकतेतुनच सराकार ही मागणी मान्य करण्यास कचरत असावे असे समजन्यास हरकत नाही. यामध्ये विरोधकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, सरकार मात्र याप्रकरणी नाकर्ते ठरल्याची जनभावना समोर येत आहे, सरकार जे.पी,सी स्थापन न करताच हे अधिवेशन गुंडाळुन टाकील आणि सध्यातरी विरोधकांवर मात करील असे दिसते. 
                                                                                                                        आपल्याला काय वाटते ? 

Monday, November 29, 2010

जगमोगन रेड्डी नी "घराणेशाही" साठी "भुकंप" घडवला ?

राजकारणात घराणेशाही अनादी कालापासुन चालु आहे, आणि आजच्या राजकीय परीस्थीमध्ये ती राजकीय नेत्यांची अपरीहार्यता बनली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांना मात्र ती काही प्रमाणात अडचणीची ही ठरत आहे, प्रत्येक राजकीय नेत्याचा वारसदार राजकीय दृष्ट्या परीपक्वच असतो असे नाही, त्याला गादीवर बसवल्यामुळे खुप मोठे राजकीय नुकसान त्या पक्षास सोसावे लागत असेल तर अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न पक्षप्रमुखाला पडतो आणि वारसदाराच्या विरोधात निर्णय गेल्यास पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार सध्या आंध्र प्रदेशात चालु आहे. आंध्र चे मुख्यमंत्री वाय.एस.आर .यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी म्हणुन त्यांचे पुत्र जगमोगन रेड्डी यांनी खुप प्रयत्न केले  परंतू कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलून रोसय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, वास्तविक पाहता अनुकंपा म्हणून जगमोगन रेड्डी यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी लोकभावना होती परंतु कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलले, जगमोगन रेड्डी यांनी त्यावेळी टोकाचा निर्णय घेतला नाही पण के.रोसय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी किरणकुमार यांना मुख्यमंत्रीदी बसवताच जगमोगन रेड्डी यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि टोकाचा निर्णय घेत  आपल्या कासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवुन दिला व आंध्र मध्ये खळबळ उडवुन दिली. महाराष्ट्रात शरद पवारांनी याच मार्गाने जावुन वेगळा पक्ष स्थापन केला व चांगले यश मिळवुन कॉग्रेस ला वठणीवर आणले तसे करण्याचा जगमोगन रेड्डी यांचा प्रयत्न असेल तर त्याला कसा प्रतीसाद मिळतो हे येणारा काळच ठरवेल.

Thursday, November 25, 2010

पाकड्यांनो आम्ही हिंमत हरलो नाहीत...

२६/११ आली 
स्रर्वांनाच आठवलं
पाकीस्तान ने दोन वर्षापुर्वी
अतीरेक्यांना भारतात पाठवलं
इथली निष्पाप माणसं मारायला
चौकाचौकात बॉंब फोडायला
पण शेवटी अतीरेक्यांनो
तुम्हीच हरलात
कारण तुम्ही बॉंब फोडले
अंदाधुंद गोळीबार केला
तरी आम्ही..
आमची जीगर हरलो नाहीत
आमची हिंमत हरलो नाहीत
आम्ही जगासमोर तुम्हाला उघडं केलं
तुम्ही मात्र उघड्या डोळ्यांनी
आमची हिंमत पहात राहीलात
आतल्या आत जळत राहीलात
आमच्या पासुन पळत राहीलात
तुमच्याशी लढताना
आमचे जवान शहीद झाले
पण जाता जाता आम्हाला
जगण्याची जिद्द देवुन गेले
पाकड्यांनो एक दिवस तरी तुम्हाला
दहशतवाद सोडावाच लागेल
आणि दिल्ली पासुन गल्ली पर्यंत
ऐकु जाइल एवढ्या जोरात
"जयहिंद" चा नारा द्यावाच लागेल... 

(२६/११ च्या पाकीस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्रांना भावपुर्ण श्रध्दांजली)
 

................अमोल देशमुख,माजलगांव(बीड)

Monday, November 22, 2010

माणसं देवासारखी अचानक भेटतात तेव्हा...

आम्ही मित्रमंडळी आपल्या काही कामानिमीत्त नुकतेच मुंबई ला गेलो होतो. आम्ही यापुर्वीही मुंबई ला गेलेलो परंतू ते रेल्वेने किंवा बसने, पण या वेळेस स्वत:ची गाडी घेवुन गेल्यामुळे मुंबई मध्ये रस्ते सापडतील का या विचारात वाशी पर्यंत आम्ही विनासायास पोहोचलो, त्यानंतर आमचे काही मित्र तेथे उतरले, आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे असल्यामुळे त्यांनी सांगीतले सरळ या रस्त्याने जा चेंबुर लागेल आणि पुढे विचारत विचारत जा, तास दोन तासात तुम्ही तेथे पोहोंचाल, आम्ही निघालो, परंतु चेंबुर च्या बरेच पुढे गेल्यावर आम्हाला नेमका रस्ता कळेना, एका सिग्नल ला आमची गाडी थांबली आजुबाजुला ब-याच गाड्या येवून थांबल्या पैकी एका गाडीचा चालक सारखा आमच्याकडे पहात असल्याचे आमच्या लक्षात आले, शेवटी त्याने आम्हास बीड चे का असे विचारले आम्ही त्यास तुम्ही कोठे असता वगैरे विचारले असता त्याने मीही बीडचाच असे सांगुन कोठे जायचे आहे असे विचारले आम्ही छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे आहे असे सांगताच त्याने मझ्या मागोमाग या असे सांगुन त्याची गाडी पुढे घेतली, आम्ही ब-याच प्रमाणात चिंतामुक्त झालो, साधारणपणे अर्धा तासात त्याने आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला नेवुन पोहोचवले आम्ही आनंदीत झालो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे आभार मानण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही कारण अनेक वाहनांच्या गर्दीत तो कुठे नाहीसा झाला हे काही आम्हाला कळाले नाही आम्ही दिवसभर आमच्या कामात व्यस्त राहीलो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे साधे आभारही मानु शकलो नाही याची दिवसभर हुरहुर लागुन राहीली, एखाद्या कठीण प्रसंगात अशी माणसं देवासारखी अचानक येतात आणि आपल्याला मदत करुन निघुन जातात तेव्हा खरा माणूसकीचा प्रत्यय येतो, आपण त्यांचे साधे आभारही मानु शकत नाहीत किंवा त्यांना काहीच देवू शकत नाहीत तेव्हा खुप कसेतरी वाटते, जगात दिशाभुल करणारी माणसेही खुप भेटतात परंतू योग्य दिशा दाखवून मदत करणारी माणसे तशी अभावाने भेटतात त्या अज्ञात मदतगाराचे मनापासुन आभार फक्त या माध्यमातुन मांडणेच आपल्या हातात आहे, यानंतर मी मात्र एवढेच करु शकतो की मीही कधीतरी अशीच कोणाला तरी त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करुन त्या अज्ञात मदतगाराचे रुण फेडू शकेल एवढेच... 

कधी संपणार या मालीका ?

हिंदी असो वा मराठी
बहु असो वा बालीका
टिव्ही लावला की
दिसतात त्याच त्याच मालीका
किती वर्षे झाली तरी
सासूचे चार दिवस
काही संपत नाहीत
रोज तेच तेच ऐकूण
पेक्षकांचे कान कसे विटत नाहीत
मालीका पाहुन प्रेक्षक म्हातारा झाला
पण मालीकातल्या सासू अन सुना
दोघीही सारख्याच तरुण दिसतात
मालीकातील सारीच नाती
आतुन पोखरलेली
बहुतेक वरुनच ती तशी भासतात
टीव्ही वर बहु असो वा बालीका
अरे देवा खरच
कधी संपणार या मालीका ?

Friday, November 19, 2010

एकदाचा शपथविधी झाला

महाराष्ट्राच्या जनतेला
नविन सरकार बद्दल
अनेक प्रश्न पडले होते
पण नव्या सरकारचे घोडे
संख्येवरुन अडले होते
एकदाचा शपथविधी झाला
आता महाराष्ट्राच्या विकासाची
घोषणा ही ते करतील
नवे मंत्री मात्र
जुन्यांचा आदर्श घ्यावा
की नवाच मेवा खावा
या विचारात पडतील

Thursday, November 18, 2010

ओबामांना प्रश्न पडला..

ओबामा आले
आम्ही दाखवलेला देश पाहुन खुश झाले
हा देश महासत्ता होणार असे बोलुन गेले
इथे तर अनेक घोटाळे करुन
नेते पांढ-या कपड्यात सजले होते
ओबामांना हार घलणा-या अनेक नेत्यांचे
आदर्श सोसायटी मध्ये मजले होते
अमेरीकेत गेल्यावर त्यांना हे कळाले
तेव्हा त्यांना प्रश्न पडला
नेत्यांनी इतके घोटाळे करुनही
हा देश दिमाखात उभा कसा राहीला
त्यांना काय माहीत
नेते कसेही असले तरी
या देशातील जीगरबाज जनतेनेच
खरं तर हा देश आजपर्यंत सांभाळला

माझ्या मनाला वाटतील त्या विषयावरील या चारोळ्या..

१) डोंबारीन

दोरीवरुन चालताना
डोंबारीन खाली कधीच पडत नसते
कारण दोरी एवढाच रस्ता आहे
ही जाणीव तिने जपलेली असते...

२) सारं कसं छान आहे..

ओबामा आले आणि म्हणाले
या देशात सारं कस छान आहे
त्यांना काय माहीत
इथे तर घोटाळ्यांच रान आहे



३) पाऊस रे...

पावसाने माझे मन ओलेचिंब भिजले,
मनातील कोरडेपण मग जागीच थीजले,
पावसाच्या धारा अनं भिरभिरणारा वारा,
मनातील भावनांचा मग फुलेल पिसारा ...

(यावर्षी पाऊस खुप झाला,पावसाळ्याच्या सुरुवातीला या चार ओळी सुचल्या होत्या)

Monday, November 15, 2010

चाळीस लाखाचा इमला..

माहीतीच्या अधिकाराने आता
एक नेताही नाही सोडला
नव्या मुख्य्मंत्र्यांचा
चाळीस लाखांचा बंगला
त्यांना की हो लगेच गावला

Friday, November 12, 2010

भ्रष्ट्राचाराचा शाप

महाराष्ट्रात पृथ्वीराज आले
आता कॉग्रेसी नेत्यांना
कोणताच घोटाळा माफ नाही
कारण दिल्लीला माहीत आहे की
महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यात गुंतलेला
कोणताच हात तसा साफ नाही
प्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या
आरोपांनी घेरलेला
प्रत्येकाचाच खजीना
काळ्या पैशानेच भरलेला
महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांना
हा भ्रष्ट्राचाराचा शाप आहे
नेते तर नेतेही तसेच
भ्रष्ट्राचाराच्या बाबतीत
नोकरशहा तर त्यांचा बाप आहे.

Tuesday, November 9, 2010

आदर्श घोटाळा

शहीदांचे भुखंडाचे श्रीखंडही
यांना पुरले नाही
कितीही खाल्ले तरी
यांचे पोट काही भरले नाही
कारगील युध्दातील शहीदांचा
भुखंडही यांनी लाटला
कॉंग्रेसच्या आदर्श घोटाळ्याचा बुरखा
किती टराटरा फाटला