Wednesday, October 12, 2016

पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक

..

सर्जीकल स्ट्राईक झाल्याची वातमी आली
आमची छाती अभिमानाने भरून गेली
दिवाळीपुर्विच देशात फटाके फुटू लागले
जय हिंद, जय जवान चे नारे घुमू लागले
सारा देश तिरंग्याखाली एकत्र आला आणि
दिल्लीतल्या वाचाळाला त्याचवेळी
एक साक्षात्कार झाला
"सर्जीकल स्ट्राईक झालीच नाही"
त्याने मग पूरावे मागीतले
त्याचे बोल पाकीस्तानात पोहोचले
गर्भगळीत झालेले शत्रु मग
वाचाळवीराला डोक्यावर घेवुन नाचले
मुंबईतल्या वाचाळवीराने लगोलग
त्याची साथ केली
हे सर्व पाहुन नवीनच मागणी झाली
"आता मुहूर्त पाहू नका"
अजून एक स्ट्राईक होवून जावु द्या
यावेळी शंभर जवानांसोबत
चार वाचाळांनाही जावु द्या
त्यांनाही  पाहू द्या की
म्रुत्यू समोर दिसत असताना
परमूलखात निधड्या छातीने घुसून
शत्रुच्या मेंदूत कशी गोळी घालतात
वाचाळांना एखादा सेल्फीही घेवु द्या
गोळ्यांचा पाऊस कसा असतो
हे एकदा त्यांनाही पाहूद्या
एसी लावून,सोफ्यावर बसून
पुरावे मागंन किती सोप असतं
हे एकदा त्यांनाही कळु द्या
मोदीजी "आता मुहूर्त पाहू नका"
अजून एक स्ट्राईक होवून जावु द्या... 

Saturday, October 8, 2016

असुरक्षीत वाटु लागले



पी.ओ.के. मध्ये सर्जिकल स्ट्राइक झाले अनं 

सीमेवर युध्दाचे ढग दाटू लागले 

पाकीस्तानचा पुळका येवून काहीजनांणा

देशात एकदम असुरक्षित वाटू लागले

Monday, October 3, 2016

कबूतर आणि धमकी

(पंतप्रधान मोदींना पाकीस्तानची कबुतरामार्फत युध्दाची धमकी या बातमीचा आधार घेवुन )


आत्तापर्यंत शांततेच प्रतीक म्हणून 
आकाशात कबूतरे सोडली जायची 
शांततेचा संदेश देवून ती 
आकाशात दिसेनाशी व्हायची 

युधाचा उन्माद इतका की 
त्यांनी बिचाऱ्या कबूतरालाही फसवलं 
शतकानुशतके प्रेमाचा आणि शांततेचा 
संदेश देणाऱ्या कबूतरालाही अखेर 
अतिरेक्यांच्या रांगेत बसवलं..,

ॲड. अमोल देशमुख 
माजलगाव 
9028574285

Saturday, October 1, 2016

युध्दाच्या छायेतील गांधीविचार

इकडे अजून शस्त्रे ताणलेली 
तिकडे मात्र खळबळ माजलेली 
सीमेवर कमालीचा तणाव आहे 
ते म्हणतात हल्ला करू 
हा मात्र बनाव आहे ..  

इकडून एक जबर तडाखा 
तिकडे हळूहळू भाषांच बदलली 
युध्दाच्या छायेत त्यांना 
गांधी विचारांची आठवण झाली .....

ॲड.अमोल देशमुख
9028574285