आदर्श म्हणॆ लवासाला
तु किती लाखाचा
तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला
तु किती कोटीचा
एक घोटाळा म्हणे दुस-याला
काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
लाखाचा असो वा कोटीचा
तुमचे आमचे सेम असते
अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागले, दोन केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झाली, एखाद्या क्रिकेट्पटुने खेळताना नवनवे उच्चांक प्रस्थापीत करावेत तसे नेत्यांनी नवनवीन घोटाळ्यांचे उच्चांक प्रस्थापीत केले.
सरत्या वर्षात महागाईने उच्चांक गाठला, पेट्रोलच्या भावात तब्बल सहा वेळा वाढ झाली, सामान्य माणसाचा जीव या महागाईत होरपळुन निघाला, कांद्याने सामान्य माणसाबरोबर सरकारच्या ही डोळ्यात पाणी आणले, सततच्या पावसाने शेतीमालावर खुप परिणाम झाला,
काही चांगले झाले असेलही परंतु २०१० ने जनतेला महागाई, भ्रष्टाचार आणि त्रास हेच जास्त प्रमाणात दिले.
Thursday, December 30, 2010
Thursday, December 23, 2010
साहित्य संमेलन का उधळवता ?
तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे. संमेलनाचा आणि क्रिडा संकुलाच्या नावाचा काहीही संबंध नाही परंतु ही धमकी केवळ सवंग प्रसीध्दी मिळवण्यासाठी दिली गेली की काय अशी शंका येते.
साहीत्य संमेलनात विचारांचे मंथन होते, तेथे विचारांचा सामना विचारांनी केला पाहीजे, विचारांचा सामना झुंडशाहीने करुन काय साध्य होणार आहे. हे संमेलन केवळ उच्चवर्णीयांचे आहे, त्याला आम्ही विरोध करणारच हे हास्यास्पद वाटते, आधुनिक महाराष्ट्रात जातीने कोणी उच्चवर्णीय ठरत नाही, त्याची वैचारीक पातळी उच्च असायला हवी, सर्वच जातीमध्ये चांगल्या आणि उच्च विचारांचे साहीत्यिक आणि विचारवंत आहेत, त्यामुळे केवळ जातीय राजकारणातुन असे हास्यास्पद आरोप कोणीच करायला नकोत. जशी राजकारण ही केवळ कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही तशीच साहीत्य ही सुध्दा कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही, राजकारणामध्ये दर्जा महत्वाचा मानला जात नाही परंतु आजही साहीत्यामध्ये "दर्जेदार साहीत्य" हा प्रकार अस्तीत्वामध्ये आहेच. आणि दर्जेदार साहीत्य हे समाजाकडुन आजही स्विकारले जाते, त्यावेळी साहीत्यीकाची जात पाहीली जात नाही. साहीत्य संमेलन उधळवुन लावु या झुंडशाहीचा सर्वस्तरातुनच निषेध होईल.

Sunday, December 19, 2010
शतकांचे "अर्धशतक" करणारा जिगरबाज "सचिन"
गेली तब्बल २१ वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये तळपणारा तेजस्वी तारा म्हणजे जिगरबाज "सचिन"...
शतकामागुन शतके आणि विक्रमामागुन विक्रम करणारा जिगरबाज "सचिन"
टिकाकारांनी कितीही टिका केल्या तरी विचलीत न होता त्यांना आपल्या बॅटनेच उत्तर देणारा जिगरबाज "सचिन"
मॅच फिक्सींग च्या वादळापासुन दुर असणारा जिगरबाज "सचिन"
२१ वर्षे अत्यंत संयमाने बॉलवरील नजर न ढळु देता बॅट आणि बॉलशी अद्वैत साधलेला जिगरबाज "सचिन"
मागील २१ वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये कितीही वादळे आली परंतु त्यातही धिरोदत्तपणे पाय रोवुन उभा राहीलेला जिगरबाज "सचिन"
१९८९ साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पाकीस्तानच्या ईम्रान,अक्रम आणि वकार चा यशस्वीपणे सामना केला आणि आपल्या करकिर्दीची सुरुवात करुन आजतागायत वयाच्या ३७ पर्यंत सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलेला जिगरबाज "सचिन"
आजही क्रिकेटवरील तिच निष्ठा,तिच जिगर,बॉलवरील तिच नजर, बॅटवरिल तिच पकड, अडचणीच्या काळातही पाय रोवुन उभे राहण्याची तिच जिगर, भारतीय क्रिकेटमधील मुकुटमणी, कोहीनुर हिरा म्हणजेच जिगरबाज "सचिन"
आजही सामना चालु असताना "सचिन आहे का रे ?’ असे विचारत तो खेळत असला तर हातातली कितीही महत्वाची कामे सोडुन त्याचा खेळ बघणारा भारतीय प्रेक्षक आणि सचिन यांचे नाते काही औरच...
त्या क्रिकेटच्या ख-याखु-या नायकाला मानाचा मुजरा...........................

Saturday, December 18, 2010
संगणकाच्या "उंदराचा" सांगाडा, अन मजेशीर चित्रे...
आपण सर्वजन रोजच संगणकाच्या सातत्याने संपर्कात असतो, माऊस तर आपला जीवलग, त्याची मजेशीर कार्टुन्स मला आंतरजालावर सापडली, आपल्याला आवडली तर बघा..
Sunday, December 12, 2010
मनोगत मेलेल्या "मी" चे...
मरणामुळे सरणावर गेलो
सरणाचे आम्हा नवल नव्ह्ते
जीवंतपणी रोजचेच तसे
सरणावर जळणे होते
जीवंत होतो मी परंतु
जगण्यासारखे काय होते
धावत होतो मी परंतु
मिळणार मज काय होते
मी असा मी तसा हे माझे ते माझॆ
रोज रोज हे माझॆ सांगणे होते
मेल्यानंतर मला उमगले
जगात आपले काहीच नव्ह्ते
जीवंतपणी माझॆ "मी" पण
मला रोज छ्ळत होते
मेल्यानंतर खरेतर माझा देह नव्हे
माझॆ मीपण जळत होते
सरणाचे आम्हा नवल नव्ह्ते
जीवंतपणी रोजचेच तसे
सरणावर जळणे होते
जीवंत होतो मी परंतु
जगण्यासारखे काय होते
धावत होतो मी परंतु
मिळणार मज काय होते
मी असा मी तसा हे माझे ते माझॆ
रोज रोज हे माझॆ सांगणे होते
मेल्यानंतर मला उमगले
जगात आपले काहीच नव्ह्ते
जीवंतपणी माझॆ "मी" पण
मला रोज छ्ळत होते
मेल्यानंतर खरेतर माझा देह नव्हे
माझॆ मीपण जळत होते
Friday, December 10, 2010
माझा शुभेच्छा मित्र..........
माझा एक बालपणीचा मित्र, वर्गमित्र सध्या अक्कल्कोट जि.सोलापुर येथे प्रथम वर्ग न्यायाधीष म्हणुन कार्यरत आहे. त्याच्या अनेक सदगुणांपैकी एक गुण म्हणजे त्याला शुभेच्छा पाठवण्याचा असलेला छंद, त्याच्या मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस त्याच्या लक्षात असतात, एकवेळ ती व्यक्ती त्याचा स्वत:चा वाढदिवस, किंवा लग्नाचा वाढदिवस कामाच्या व्यापात विसरेल परंतु हा पठ्ठ्या विसरणार नाही, मी तर हमखास माझ्या बायकोचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस विसरतो आणि मोबाईलवर सकाळी सकाळीच आमच्या लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छांचा त्याचा मेसेज येवुन धडकला की मग मला धावपळ करावी लागते आणि वेळ मारुन न्यावी लागते. यावर्षी मी नविन घर बांधले ,वास्तुशांतीचा मुहुर्त ईतक्यात नसल्यामुळॆ गणेशपुजन करुन गृहप्रवेश करण्याचे ठरवुन आम्ही कार्यक्रमाची आखणी केली, वाढता वाढता गृहप्रवेश चा कार्यक्रम मोठा झाला, मी ब-याच माझ्या मित्रांना व नातेवाईकांना त्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, आमच्या सौ च्या शाळेतील कर्मचारी, भावाचे मित्र, आईचे महीला मंडळ, वडीलांचे मित्र असे मिळुन ब-याच जनांना आमंत्रण दिले गेले ,बरेच जन विसरल्याचे कार्यक्रमाच्या दिवशी लक्षात आले परंतु ऐनवेळेस आमंत्रण देणे शक्य नसल्यामुळे आम्ही कळुनही त्यांना आमंत्रण देवु शकलो नाही. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी अक्कल्कोटहुन खास वेळ काढुन हे महाशय सपत्नीक कार्यक्रमाला वेळेवर हजर झाले, माझ्या डोळ्यात क्षणभर पाणी आले की आपण त्याला कसे काय विसरलो ? आणि न्यायाधीषासारख्या पदावर काम करताना वेळात वेळ काढुन तो मात्र कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणुन मनात कुठलेही किल्मीश न ठेवता कार्यक्रमाला वेळेवर हजर झाला, मला मेल्याहुन मेल्यासारखे झाले, शेवटी आपण आपल्या आनंदात आपल्या आप्तेष्टांना सामील करुन घेण्यासाटीच असे कार्यक्रम करत असतो आणि सर्वजण आले तरच आपला तो कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडतो. आज समाजात वावरताना प्रत्येकालाच त्याच्या "इगोने" ग्रासलेले आहे, मला बोलावले नाही मी जाणार नाही अशी जवळची नातेवाईक मंडळी ही भुमीका घेतात आणि साध्या शुभेच्छा ही देत नाहीत, या "इगोवर" मात करणं कदाचीत मलाही अवघड गेलं असतं. त्या दिवशी इतके पाहुने येवुनही मला जेवढा आनंद झाला त्याही पेक्षा जास्त आनंद आणि समाधान त्याच्या येण्यामुळे झाला, त्यानंतर त्याची परत प्रत्यक्ष भेट झाली नाही पण ९ डिसेंबरला त्याचा वाढदिवस होता , १ डिसेंबर पासुन मी घोकत होतो पण ऐन वेळेस विसरलो, एवढे रामायण होवुनही मी त्याचा वाढदिवस परत एकदा विसरलो, खरचं माझा हा करंटेपणा मलाही टोचायला लागला आणि हे सर्व आपणासमोर मांडावे आपला अनुभव आपल्या ब्लॉगर मित्रांना सांगावा म्हणुन हा खटाटोप केला, या जगात मोठ्या मनाची माणसं आहेत हे मात्र या निमीत्ताने मला कळलं एवढच काय ते फलीत............................
Tuesday, December 7, 2010
खरच आपल्याला मराठीची लाज वाटते ?
महाराष्ट्रात राहणा-या ९० टक्क्यापेक्षा जास्त मराठी बांधवांना मराठीची लाज वाटत नाही हे मी छातीठोकपणे सांगु शकतो, ईंग्रजीची ज्यांना खाज आहे त्यांना मात्र ईंग्रजी बोलण्यात मजा वाटत असावी. मोठमोठ्या पदावर असणारे काही मुळ मराठी असलेले लोकच इंग्रजाळलेले मराठी बोलताना मी बघीतले आहेत. मराठी बाणा जागवणारा आजपर्यंत कोणी भेटलाच नव्हता म्हणुन मराठी भाषेला ईंग्रजी सारखा दर्जा प्राप्त झाला नाही. आपण राहतो मराठी मुलखात आणि तेथे आमच्या दुकानावर पाट्या ईंग्रजी मध्ये हा विनोद म्हणावा का ईंग्रजी चे अंध अनुकरन , आम्ही आमच्या गावात आमच्या काही व्यापारे मित्रांना हे समजावुन सांगीतले की आपण मराठी आपले ग्राहक मराठी त्यांना ईंग्रजी कमी आणि मराठी अधीक समजते मग दुकानाच्या पाट्या ईंग्रजीत का लावता, त्यातल्या बहुतांश जनांनी आपल्या पाट्या सुंदर मराठीत करुन घेतल्या त्यांच्या दुकानात येणा-या ग्राहकांची संख्या वाढली. त्यांचेही समाधान झाले मलाही मराठी साठी काहीतरी केल्याचे समाधान मिळाले.
आपले नेतेही दिल्लीत गेल्यावर हिंदीतुन, ईंग्रजीतुन किंवा इंग्रजाळलेल्या मराठीतुन बोलताना दिसतात ते महाराष्ट्रात परत आल्यावर सुध्दा त्याचेच अनुकरण करतात, त्यांनी दिल्लीतच काय संसदेत सुध्दा मराठीत बोलले पाहीजे म्हणजे मराठी माणसांचा उत्साह आणखी वाढेल.
मराठी स्पर्धा जागतीक दर्जा मिळालेल्या ईंग्रजी शी नाही ज्यांना मराठी समजतच नाही त्यांच्यापाशी कितीही डोके फोडले तरी काय उपयोग आहे त्यासाठी मराठी भाषेला जागतीक दर्जा प्राप्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणवर प्रयत्न होणे आवश्यक आहे, आधी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांनी मराठीतुनच बोलायला पाहीजे , ब-याच शहरात मराठी माणुसच एकमेकांशी हिंदीतुन, ईंग्रजीतुन किंवा इंग्रजाळलेल्या मराठीतुन बोलताना दिसतात हे चित्र बदलले पाहीजे.
मराठी संकेतस्थळांमुळे सध्यातरी मराठीला चांगले दिवस आल्यासारखे वाटत आहेत, आंतरजालावर मराठी जनांची संख्या झपाट्याने वाढते आहे आणि या चळवळीतुनच मराठी भाषेला जागतीक दर्जा प्राप्त होणार हे निश्चीत.

Subscribe to:
Posts (Atom)