Wednesday, October 12, 2016

पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक

..

सर्जीकल स्ट्राईक झाल्याची वातमी आली
आमची छाती अभिमानाने भरून गेली
दिवाळीपुर्विच देशात फटाके फुटू लागले
जय हिंद, जय जवान चे नारे घुमू लागले
सारा देश तिरंग्याखाली एकत्र आला आणि
दिल्लीतल्या वाचाळाला त्याचवेळी
एक साक्षात्कार झाला
"सर्जीकल स्ट्राईक झालीच नाही"
त्याने मग पूरावे मागीतले
त्याचे बोल पाकीस्तानात पोहोचले
गर्भगळीत झालेले शत्रु मग
वाचाळवीराला डोक्यावर घेवुन नाचले
मुंबईतल्या वाचाळवीराने लगोलग
त्याची साथ केली
हे सर्व पाहुन नवीनच मागणी झाली
"आता मुहूर्त पाहू नका"
अजून एक स्ट्राईक होवून जावु द्या
यावेळी शंभर जवानांसोबत
चार वाचाळांनाही जावु द्या
त्यांनाही  पाहू द्या की
म्रुत्यू समोर दिसत असताना
परमूलखात निधड्या छातीने घुसून
शत्रुच्या मेंदूत कशी गोळी घालतात
वाचाळांना एखादा सेल्फीही घेवु द्या
गोळ्यांचा पाऊस कसा असतो
हे एकदा त्यांनाही पाहूद्या
एसी लावून,सोफ्यावर बसून
पुरावे मागंन किती सोप असतं
हे एकदा त्यांनाही कळु द्या
मोदीजी "आता मुहूर्त पाहू नका"
अजून एक स्ट्राईक होवून जावु द्या... 

No comments:

Post a Comment