Sunday, January 23, 2011

२६ जानेवारी वा १५ ऑगष्ट ला आपण काय करता ???

आपण स्वतंत्र भारताचे नागरीक, आपण २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

आपण त्या दिवशी काय करतो, कारण ते आपले राष्ट्रीय सण आहेत. आपण शाळेत असताना या दोन्ही दिवशी फार उत्साहात असायचो, एक दिवस आधी आपण त्याची तयारी करायचो, शाळेच्या गणवेश तयार करणे, बुटपॉलीश करणे वगैरे तयारी करायचो आणि त्यादिवशी उत्साहाने सकाळीच शाळेत जायचो, झेंडावंदनाला आभिमानाने उपस्थीत रहायचो, प्रभातफेरीमध्ये सहभागी होवुन "एक रुपया चांदीचा, भारत देश गांधीचा", "एक दोन तिन चार, भारतमातेचा जयजयकार" अशा घोषना द्यायचो, त्या दिवशी देशपेमात न्हाहुन निघायचो, पण आत्ता मोठ्ठे झाल्यावर आपण त्या दिवशी नेमके काय करतो ?

नोकरदार वर्ग त्यांच्या कार्यालयात झेंडावंदनाला जातात पण इतर नागरीक झेंडावंदनाला जातात का ? ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सार्वजनीक झेंडावंदन होते तेथे आपण उपस्थीत राहतो का ? शाळा, महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर किती जण न चुकता झेंडावंदनाला उपस्थीत असतात ?

आपण त्या दिवशी हे मात्र करु शकतो, झेंडावंदनाला उपस्थीत राहु शकतो, प्लास्टीकचे झेंडे वापरला बंदी असताना देखील ते झेंडे सर्रास विकायला येतात, लहान मुले ते विकत घेतात, परंतु काही वेळा ते रस्त्यावर टाकुन देतात, असे रस्त्यावर पडलेले झेंडे आपण गोळा करु शकतो, त्यामुळे झेंडे पायदळी तुडवले जाणार नाहीत ,झेंड्यांचा होणारा अपमान तरी टळेल.

वर्षभर नाही तरी १५ ऑगष्ट, २६ जानेवारी, १ मे यादिवशी आपल्या देशभक्तीला उधान आलेले असते, यावेळी किमान एवढे जरी केले तरी आपल्याला समाधान लाभेल असे वाटते .

No comments:

Post a Comment