Thursday, September 29, 2016

लाहौरवर लवकरच तिरंगा फडकेल....



उरी हल्ल्यात 18 जवान शहीद..
मन सुन्न, छिन्न विछीन्न झाले
10 दिवसात 36 आतंकवादी मारून
वीर जवान भारतात सुखरूप परत आले..

पाकड्यांचा श्वास आता
त्यांच्या घशातच अडकेल
पुन्हा आगळीक केली तर
लाहौर मध्ये लवकरच तिरंगा फडकेल..

आता भारतीय जवान असेच
पाकड्यांना घरात घुसून मारतील
पुन्हा वाकडी नजर कराल तर
त्यांच्या छातीत भूकंप करतील ..

पाकड्यांनो इतिहास का विसरता
तुम्ही अनेकदा नाक घासले आहे
आम्ही उरीचा बदला घेवुन
तुमच्या तोंडाला काळे फासले आहे...

ॲड. अमोल देशमुख
माजलगाव
9028574285

Tuesday, September 20, 2016

आमच्या संवेदना तशाच विरतील

उरी हल्ल्यातील आज आणखी एक जवान शहीद.,18 झाले
---------------------------------------
शहीद झाले सैनीक ऊरीत
सांडले त्यांचे रक्त
पावन झाली भारतमाता
आता उरल्या वेदना फक्त
कोण होते ते शहीद जवान
कोणता त्यांचा धर्म
जात कोणती त्यांची
कोणती त्यांचा वर्ण
कोणता त्यांचा प्रांत
कोणती त्यांची भाषा
ते फक्त भारतमातेचे पुत्र होते...
त्यांच्यासाठी..
आता कोणी काढेल का मोर्चा
कोणी काढेल का कॅडल मार्च
कोणी गाळेल का आश्रू
घडेल का मिडीयावर चर्चा
असं काहीच होणार नाही
*आज 18 मेले
उद्या 25 मरतील
आमच्या संवेदना तशाच विरतील
आमची सारी रुदनं आमच्या जातीसाठी
सत्ताधाऱ्यांची मतासाठी
मिडीयाची टी.आर.पी. साठी
*ते मात्र निरंतर शहीद होतात
फक्त भारतमातेसाठी.....*

अमोल देशमुख
20/09/2016                         

Monday, September 19, 2016

शहीदांच्या विरमरणाची बातमी

वाचतो आम्ही नित्य नवी

शांततेसाठी आता

फक्त युद्धाची बातमी हवी...
-----------------------------

अमोल देशमुख..
दि 19-09-2016
पाकड्यांनी केला रात्रीस भ्याड हल्ला

*शहीदांच्या रक्ताने भारतभू नहाली*

भिजलेल्या डोळ्यात अंगार का पेटेना

*का मायभू भारता वेळ तुझ्यावर आली ?*
--------------------------------
*अँड. अमोल देशमुख*
19_09_2016
शूरवीरांचा देश आपला

शौर्य आमुची गाथा आहे

भ्याड हल्लेखोर पाकड्यांचा

किती कलंकीत माथा आहे....

अँड. अमोल देशमुख
१९ सप्टेंबर २०१६

Monday, September 12, 2016

ताप आहे

योगेंद्र यादव म्हणतात
आप मध्ये राहणे आता पाप आहे 
केजरीवाल म्हणजे
डोक्याला नुसता ताप आहे   ......


Adv.Amol Deshmukh.

x

घड्याळ  ...... 

ध्येय गाठायचे  असते
घडयाळातील तासकाटयाला
पण सेकंद काटा सर्वात जास्त पळतो
पण वेळ सांगताना मात्र आपण
सेकंद काट्याचा
साधा उल्लेखही टाळतो  ...

Saturday, September 3, 2016

उदोउदो




वाद होतील म्हणून आजकाल
चर्चा होणेच टळते
पण काहीना  वाटते
सर्वकाही मलाच कळते

वाद झाले तरी चालतील
पण चर्चा ही घडलीच पाहीजे
घुसमटलेल्या विचारांना
मोकळी वाट  दिलीच पाहीजे

अर्ध्या हलकुंडात पिवळे होवून
स्वतःचा  उदोउदो  तरी  किती करता
परिघाबाहेर  बघा
विदवानांची रास  आहे
ते मुकपणे सारे पाहतात
पण त्यांना कुठे प्रसिध्दीचा  ध्यास आहे  ...