Friday, September 10, 2010

जातीयवादाची ही विषारी फळे खरचं कोणी चाखायची....

आम्ही भारतीय
आम्ही महाराष्ट्रीयन
आम्ही या मातीचे
हे सारं मागे पडलं हो..
आता
आम्ही या जातीचे
आम्ही त्या जातीचे
जातीनिहाय....
आमचे नेते वेगळे
आमचे रंग वेगळे
आमचे झेंडे वेगळे
आम्ही त्यांचा द्वेष करणार
ते आमचा द्वेष करणार
आमच्या अंगणात फुलाचे झाड नाही पण
जातीची ही विषवल्ली मात्र
आम्ही सर्वांनीच जोपासली
त्याला नेत्यांनी व्यवस्थीत खतपाणी घातले
सरकारने आधार दिला
त्याची कडु फळे मात्र चाखावी लागतील
आमच्या येणा-या पिढीला
आम्ही त्यांना काय देतोय
सुरक्षीत भविष्य का
जातीची ही विषारी फळे..
खरच विचार करा

वादग्रस्त लिखाण करुन ब्लॉग वाचकप्रीय बनवता येत नाही...

सध्या मराठी ब्लॉग ची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. ब्लॉगवर कवीता, लेख, ललीत, गड किल्ल्यांची माहीती ,सामाजीक, चिंतनीय,विनोदी, किंवा समाज उपयोगी साहीत्य ब-याच प्रमाणात लिहीले जाते अशा ब्लॉग ना मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग मिळतो आणि अशा ब्लॉग ना भेट देवुन चांगल्या लेखांना, कवितांना वाचुन आपले अभिप्राय नोंदवता येतात परंतु आजकाल काही माथेफीरु, स्वयंघोषीत विद्वान आपल्या ब्लॉगमधुन वादग्रस्त लिखान करुन वाचकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला फारसे कष्ट पडत नाहीत पण आपली लेखणी अशांसाठी का झीजवायाची, अशा माथेफीरुंना उत्तर म्हणजे त्यांच्या ब्लॉगकडे दुर्लक्ष करणे, त्यांना फारशी किंमत न देणे. बर हे स्वयंघोषीत विद्वान थोर इतिहासकार, इतिहासातील थोर सेनानी ज्यांना जगमान्यता लाभलेली आहे, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुर्णच होवु शकत नाही अशा जेष्ठ विभुंतींबद्दल अपशब्द वापरुन स्वत:ला प्रसीध्दी मिळवण्याचा प्रयत्न करताना वारंवार दिसतात, मराठीसुची संकेतस्थळावर असाच एक "बी" ग्रेड किंवा "सी" ग्रेड लेखाचे फक्त शिर्षक माझ्या पाहण्यात आले अशा लोकांना उत्तरेच देवु नयेत त्यांचा माथेफिरुपणा कमी होईल.

Tuesday, September 7, 2010

एस.एम.एस. संग्रह..

दिवस ईवल्याश्या पक्षांसारखे असतात
भुर्रकन उडून जातात..
आणि मागे ठेवतात आठवणींची पिसे
काही पांढरी, काही काळी
काही मऊ काही खरखरीत
आपण जमतील तेवढी गोळा करायची
गुंफून बनवायची
एक आठवणींची चटई
जीवनाच्या संध्याकाळी
निवांत पडण्यासाठी..........

मातृदिनानिमीत्त....

शिंपल्यात पाणी घालुन
समुद्र दाखवता येत नाही
हाताने काढलेल्या फुलाला
सुगंध येवु शकत नाही
निळ्याभोर गगनाचा
अंत काही होत नाही
अन
आईच प्रेम
शब्दात व्यक्त होत नाही....

मातृदिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा...

Friday, September 3, 2010

"ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मीती"..मा.रामदासजी फुटाणे यांनी सांगीतलेला मजेशीर किस्सा..

आमच्या माजलगांव येथे रोटरी क्लबच्या २०१० च्या पदग्रहण समारंभात प्रसीध्द कवी, वात्रटीकाकार मा.आ.रामदासजी फुटाणे यांनी आपल्या भाषणातुन सांगीतलेला हा गंमतीशीर किस्सा.
    महाराष्ट्राच्या उर्जा खात्याने वाढलेल्या विजेच्या समस्येवर उपाय करायचे ठरवले, विजेची मागणी जास्त आणि विजेची निर्मीती कमी यामुळे "लोडशेडींग" चा पर्याय ही शासनानेच काढला होता त्यापुढे जावुन "विजेची बचत हिच विजेची निर्मीती"  ही संकल्पना राबवायचे असे उर्जामंत्र्यांनी ठरवले,  उर्जा खात्याच्या सर्व उच्च अधिका-यांच्या बैठ्कीत ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरले, त्यानुसार राज्यातील प्रत्येक शहरात, गावांत वाड्या वस्त्यांवर या योजनेच्या प्रसीध्दीसाठी मोठे मोठे  बॅनर लावायचे ठरले, त्यासाठी लाखो रुपयांचे बजेट मंजुर करण्यात आले, राजकीय चालीरिती प्रमाणे बॅनर लावायचे काम ज्याला द्यायचे होते त्याला देण्यात आले, बॅनर लावायचे काम पुर्ण झाल्यानंतर याचा अहवाल उर्जामंत्र्यांना देण्यात आला. उर्जामंत्र्यांनाही रोज मंत्रालयात जाताना, दौ-यावर असताना या "विजेची बचत हिच विजेची निर्मीती" योजनेचे लाईटच्या झगमगाटातले मोठे बॅनर दिसु लागले, परंतु उर्जा खात्याला त्याचा फारसा प्रभाव जाणवत नव्हता, एवढा गाजावाजा, जाहीरात करुनही फारसा फरक का पडत नाही हे कोणालाच कळत नव्हते शेवटी मत्र्यांनी ग्रामीण भागात जावुनच खरे चित्र पहायचे ठरवले.
    मंत्री पाहणी करण्यासाठी ग्रामीण भागाच्या दौ-यावर निघाले, एका गावांत जाण्यासाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा आत वळला, वळणदार रस्त्यांनी "वळसे" घेत "वळसे" घेत त्यांनी गावात प्रवेश केला, गावाच्या वेशीजवळ त्यांना "विजेची बचत हिच विजेची निर्मीती" योजनेचे मोठे बॅनर दिसले तेथे त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला, त्यांना पाहुन गावक-यांनी त्यांच्यापाशी गर्दी केली मंत्री महोदयांनी गावक-यांना विज बचतीबद्दल सांगुन लोड्शेडींगच्या त्रासातुन लवकर मुक्तता हवी असेल तर विजेची बचत किती आवश्यक आहे हे समजावुन सांगीतले, त्यानंतर गावातल्या इतर शासकीय योजना, गावातील दवाखाना, शाळा याबद्दल विचारले त्यावर गावक-यांनी सर्वकाही ठीक आहे परंतु शाळा मात्र बंद आहे असे उत्तर दिले, मंत्री महोदयांनी शाळा का बंद आहे हे वारंवर विचारले असता गावक-यांनी मंत्री महोदयांना एकसुरात उत्तर दिले की "ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मीती" त्यानंतर मात्र मंत्री महोदयांनी कपाळावर हात मारुन घेत तेथून काढता पाय घेतला...........

Wednesday, September 1, 2010

खाजगी शाळांची शुल्कवाढ

"विनाअनुदानीत खाजगी शाळांना फीवाढीचा अधिकार"  पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी बातमी, न्यायालयाने सरकारचे आदेश रद्दबदल केले मात्र खाजगी शिक्षणसंस्थांना मनाला वाटेल तेवढी फीस घेण्याचे अधिकारच बहाल झाले. विनाअनुदानीत खाजगी शाळांच्या शुल्क निश्चीतीसाठी शासनाने जी.आर. काढलेले असतानासुध्दा विनाअनुदानीत खाजगी शाळा या आदेशाला केराची टोपली दाखवत होत्या. सरकारच्या या आदेशाला न जुमानता त्या भरमसाठ फीस घेत होत्या. या फीसवाढीच्या विरोधात पालकांनी मोर्चे काढले, रस्ता रोको, शाळांना कुलुप ठोकने अशा प्रकारची आंदोलने केली, मोठ्या प्रमाणावर एकजुट दाखवली परंतू न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालकांचा संघर्षाला खिळ बसली, न्यायालयाच्या या निर्णयामुळे पालकवर्ग अस्वस्थ आहे. आता शासन विनाअनुदानीत खाजगी शाळांच्या शुल्कनिश्चीती प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवु शकत नाही. यापुढे शैक्षणीक पात्रता असुनही  केवळ आर्थीक दुर्बलतेमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या शाळांमधुन प्रवेश मिळणार नाही. श्रीमंत पालक आपल्या मुलांना पाहीजे तेवढी फीस भरुन अशा प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेश देतील, मात्र सरकारला यापुढे तरी विनाअनुदानीत खाजगी शाळांच्या शुल्कनिश्चीती प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करुन अशा पालकांना दिलसा देवु शकेल मात्र हे सर्व सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबुन आहे, कारण, यातील बहुतांश संस्था या नेतेमंडळींच्या आहेत, आणि त्यावर लगाम घालणे इतके सोपे नाही...

खाजगी शाळांची शुल्कवाढ
आता त्यांची मक्तेदारी झाली
सर्वांना मोफत शिक्षण
ही संकल्पनाच आता कालबाह्य झाली...
कितीही फीस घेतली तरी आता
शासनही हतबल झाले
या शिक्षणसंस्थांना मात्र
चरायला मोकळे रान मिळाले...  

क्रिकेटपटुंवर बंदी ची मागणी

अ‍ॅलन लॅंब  (इंग्लंडचा माजी क्रिकेटपटु) ची मागणी......
त्या पाकीस्तानी क्रिकेटपटुंवर बंदी घाला
मग मॅच फिक्सींग बंद होइल..
पुढे काय होइल....
पाकीस्तानी संघातील जुने खेळाडू जातील
त्यांच्या जागी नविन खेळाडू येतील
परत फिक्सींग सुरु करतील
आसिफ, आमेर, अकमल, बट तर मग
नक्कीच बुकी बनतील..
खेळ नको पाकीस्तानी क्रिकेटर्सना फक्त पैसा हवा आहे
पाकीस्तानी क्रिकेटचा हा चेहरा
जगासाठी थोडाच नवा आहे...