Wednesday, October 13, 2010

क्रिडा क्षेत्र होवु शकते का करिअर ?


प्रत्येक पालकाला वाटते आपल्या पाल्याने काहीतरी वेगळ करावं, वेगळा मार्ग निवडावा, एखाद्या क्षेत्रात नांव कमवावे आणि त्यासाठी त्यांची  अव्याहत धडपड चालु असते. काहींना क्रिडा क्षेत्रात मुलाने नांव कमवावे वाटते परंतु त्यातील बहुतांशी जनांचे आपला मुलगा क्रिकेटर व्हावा हेच स्वप्न असते कारण इतर क्रिडा प्रकारांपेक्षा क्रिकेटमध्ये क्रिकेटपटूंना मिळणारे मोठे ग्लॅमर मिळते, प्रचंड प्रमणात मिळणारा पैसा मिळतो. खुप प्रयत्न करुनही भारतीय संघांत स्थान मिळाले नाही तरी रणजी किंवा एखाद्या परदेशी क्लबशी करार करुन करिअर करता येते, नव्यानेच सुरु झालेल्या आय.पी.एल. मुळे तर क्रिकेटमध्ये पैश्याचा पाउस पडत आहे आणि यामुळेच पालकांनी आपला मुलगा क्रिकेटपटूं व्हावा हे स्वप्न पहाणं स्वाभाविक आहे. क्रिकेटव्यतीरिक्त इतर क्रिडाप्रकारामध्ये करिअर करण्याबद्दल पालकांचाच काय मुलांचाही तितकासा ओढा दिसुन येत नाही.
    इतर क्रिडाप्रकारात विषेशत: वैयक्तीक क्रिडाप्रकारंमध्ये म्हणजे नेमबाजी, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ति, बॉक्सींग, यामध्ये करिअर करायला खुप संधी आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या शारीरिक क्षमतेचा,त्याच्या खेळाविषयीच्या आवडीचा विचार करुन त्याला प्रोत्साहीत करावे, त्याला चांगला प्रशीक्षक मिळवून द्यावा, त्याने मेहनत घेतली तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणे शक्य होईल. आणि या क्रिडाप्रकारांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदक मिळवणे व हाच यशस्वीतेचा मुख्य निकष असतो आणि पदके मिळवण्यामधील सातत्यामुळे खेळाडूची कारकीर्द घडते युथ गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशीयन गेम्स, ऑलींपीक अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधुन पदक मिळवल्याशिवाय खेळाडूंना राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त होत नाही. पदक मिळवणा-या खेळाडूंना मात्र काही प्रमाणात पैसा ही मिळतो आणि रेल्वे, सरकारी विमानकंपन्या, पोलीस खाते अशा ठिकाणी चांगली नोकरी मिळू शकते.
    इतर क्रिडाक्षेत्रात करिअरला खरोखरच वाव आहे परंतू त्यासाठी अपार मेहनत, मोठा खर्च याची निनांत आवशकता आहे. सरकारने (क्रिडा खात्याने) खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर आपला एशीयन गेम्स, ऑलींपीक  मधील पदकांचा दुश्काळ संपेल. चालु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भालाफेकीत भारतीय महिला ८ व्या  व ९ व्या क्रमांकावर आल्या, त्यांनी परदेशी खेळाडूंचे फायबरचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाले पाहुन केवळ उच्च दर्जाचे साहीत्य नसल्यामुळे आम्ही पदकापासुन वंचीत राहीलो अशा प्रतीक्रिया खेळाडूंकडून आल्या. तर सर्वच क्रिडा प्रकारामध्ये तयारीबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा साहीत्य ही अत्यंत आवश्यक आहे.
    आपले संपुर्ण आयष्य खेळासाठी खर्च घालणा-या अ‍ॅथलिट्स ना निवृत्ती घेतल्यानंतर फार हलाखीचे जीवन जगावे लागते, सरकार त्यांची जबाबदारी घेत नाही, अशा ब-याच कारणांमुळे क्रिडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे येत नाहीत.

No comments:

Post a Comment