Friday, December 10, 2010

माझा शुभेच्छा मित्र..........

माझा एक बालपणीचा मित्र, वर्गमित्र सध्या अक्कल्कोट जि.सोलापुर येथे प्रथम वर्ग न्यायाधीष म्हणुन कार्यरत आहे. त्याच्या  अनेक सदगुणांपैकी एक गुण म्हणजे त्याला शुभेच्छा पाठवण्याचा असलेला छंद, त्याच्या मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस त्याच्या लक्षात असतात, एकवेळ ती व्यक्ती त्याचा स्वत:चा वाढदिवस, किंवा लग्नाचा वाढदिवस कामाच्या व्यापात विसरेल परंतु हा पठ्ठ्या विसरणार नाही, मी तर हमखास माझ्या बायकोचा वाढदिवस आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस  विसरतो आणि मोबाईलवर सकाळी सकाळीच आमच्या लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छांचा त्याचा मेसेज येवुन धडकला की मग मला धावपळ करावी लागते आणि वेळ मारुन न्यावी लागते. यावर्षी मी नविन घर बांधले ,वास्तुशांतीचा मुहुर्त ईतक्यात नसल्यामुळॆ गणेशपुजन करुन गृहप्रवेश करण्याचे ठरवुन आम्ही कार्यक्रमाची आखणी केली, वाढता वाढता गृहप्रवेश चा कार्यक्रम मोठा झाला, मी ब-याच माझ्या मित्रांना व नातेवाईकांना त्या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले, आमच्या सौ च्या शाळेतील कर्मचारी, भावाचे मित्र, आईचे महीला मंडळ, वडीलांचे मित्र असे मिळुन ब-याच जनांना आमंत्रण दिले गेले ,बरेच जन विसरल्याचे कार्यक्रमाच्या दिवशी लक्षात आले परंतु ऐनवेळेस आमंत्रण देणे शक्य नसल्यामुळे आम्ही कळुनही त्यांना आमंत्रण देवु शकलो नाही. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी अक्कल्कोटहुन खास वेळ काढुन हे महाशय सपत्नीक कार्यक्रमाला वेळेवर हजर झाले, माझ्या डोळ्यात क्षणभर पाणी आले की आपण त्याला कसे काय विसरलो ? आणि न्यायाधीषासारख्या पदावर काम करताना वेळात वेळ काढुन तो मात्र कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणुन मनात कुठलेही किल्मीश न ठेवता कार्यक्रमाला वेळेवर हजर झाला, मला मेल्याहुन मेल्यासारखे झाले, शेवटी आपण आपल्या आनंदात आपल्या आप्तेष्टांना सामील करुन घेण्यासाटीच असे कार्यक्रम करत असतो आणि सर्वजण आले तरच आपला तो कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडतो. आज समाजात वावरताना प्रत्येकालाच त्याच्या "इगोने" ग्रासलेले आहे, मला बोलावले नाही मी जाणार नाही अशी जवळची नातेवाईक मंडळी ही भुमीका घेतात आणि साध्या शुभेच्छा ही देत नाहीत, या "इगोवर" मात करणं कदाचीत मलाही अवघड गेलं असतं. त्या दिवशी इतके पाहुने येवुनही मला जेवढा आनंद झाला त्याही पेक्षा जास्त आनंद आणि समाधान त्याच्या येण्यामुळे झाला, त्यानंतर त्याची परत प्रत्यक्ष भेट झाली नाही पण ९ डिसेंबरला त्याचा           वाढदिवस होता , १ डिसेंबर पासुन मी घोकत होतो पण ऐन वेळेस विसरलो, एवढे रामायण होवुनही मी त्याचा वाढदिवस परत एकदा विसरलो, खरचं माझा हा करंटेपणा मलाही टोचायला लागला आणि हे सर्व आपणासमोर मांडावे आपला अनुभव आपल्या ब्लॉगर मित्रांना सांगावा म्हणुन हा खटाटोप केला, या जगात मोठ्या मनाची माणसं आहेत हे मात्र या निमीत्ताने मला कळलं एवढच काय ते फलीत............................

No comments:

Post a Comment