Tuesday, September 14, 2010

सल्लुमियाचा बालीशपणा..

२६/११ चा मुंबई वरील दहशदवादी हल्ला हा श्रीमंतांवर झालेला हल्ला होता म्हणुन त्याचा अधिक बोलबाला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यात शेजारच्या देशाचा हात नव्हता अशी मुक्ताफळे सल्लुमियाने उधळली,  बालीश वक्तव्ये करुन प्रसिध्दी मिळवण्याचा स्टंट सल्लुमियाच्या चांगलाच अंगलट आला, अशी विधाने करुन त्याला काय साधायचे होते हे त्याचे त्यालाच माहीत. कदाचित वादग्रस्त विधान करुन चर्चेत येवुन त्याच्या दबंग ला प्रसीध्दी मिळवुन देण्याचा त्याचा प्रयत्न असावा, तसे असेल तर तो प्रयत्न फसला असेच म्हणावे लागेल.
    मुंबई मध्ये ताज,ओबेराय वर हल्ला झाला तेथे फक्त श्रीमंताचेच वास्तव्य असते असे त्याचे म्हणने होते परंतु त्याचवेळी जे.जे. हॉस्पीटल, कामा हॉस्पीटल, सी.एस.टी. येथेही दहशदवाद्यांनी हल्ला करुन मोठ्या संख्येने निश्पाप नागरिकांना मारले हे सल्लुमिया विसरला आणि बेलगाम वक्तव्य करुन गेला. असे विधान करुन सलमान खान ने मात्र आपले हसे करुन घेतले. सरकारने त्याच्या या वक्तव्याची गांर्भीयाने दखल घेवुन त्याला फटकारायला हवे होते, परंतु सलमानवर ताबडतोब सर्वबाजुंनी टीका झाल्यावर त्याने माफी मागुन या वादातुन आपली सुटका करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. काही दिवंसांपुर्वी सलमानने आपल्या गाडीखाली फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांना चिरडले होते ते गरीबच होते, त्यावेळी त्याने आपण सेलेब्रीटी असल्यामुळेच या प्रकरणाला जास्त प्रसीध्दी देण्यात आली असा कांगावा केला होता. सलमान खान ने यापुढेतरी अशी बेलगाम वक्तव्ये करु नयेत अशीच सर्वांची अपेक्षा असणार..
     

No comments:

Post a Comment