Sunday, December 12, 2010

मनोगत मेलेल्या "मी" चे...

मरणामुळे सरणावर गेलो
सरणाचे आम्हा नवल नव्ह्ते
जीवंतपणी रोजचेच तसे
सरणावर जळणे होते
जीवंत होतो मी परंतु
जगण्यासारखे काय होते
धावत होतो मी परंतु
मिळणार मज काय होते
मी असा मी तसा हे माझे ते माझॆ
रोज रोज हे माझॆ सांगणे होते
मेल्यानंतर मला उमगले
जगात आपले काहीच नव्ह्ते
जीवंतपणी माझॆ "मी" पण
मला रोज छ्ळत होते
मेल्यानंतर खरेतर माझा देह नव्हे
माझॆ मीपण जळत होते

No comments:

Post a Comment