Tuesday, December 7, 2010

खरच आपल्याला मराठीची लाज वाटते ?

महाराष्ट्रात राहणा-या ९० टक्क्यापेक्षा जास्त मराठी बांधवांना मराठीची लाज वाटत नाही हे मी छातीठोकपणे सांगु शकतो, ईंग्रजीची ज्यांना खाज आहे त्यांना मात्र ईंग्रजी बोलण्यात मजा वाटत असावी. मोठमोठ्या पदावर असणारे काही मुळ मराठी असलेले लोकच इंग्रजाळलेले मराठी बोलताना मी बघीतले आहेत. मराठी बाणा जागवणारा आजपर्यंत कोणी भेटलाच नव्हता म्हणुन मराठी भाषेला ईंग्रजी सारखा दर्जा प्राप्त झाला नाही. आपण राहतो मराठी मुलखात आणि तेथे आमच्या दुकानावर पाट्या ईंग्रजी मध्ये हा विनोद म्हणावा का ईंग्रजी चे अंध अनुकरन , आम्ही आमच्या गावात आमच्या काही व्यापारे मित्रांना हे समजावुन सांगीतले की आपण मराठी आपले ग्राहक मराठी त्यांना ईंग्रजी कमी आणि मराठी अधीक समजते मग दुकानाच्या पाट्या ईंग्रजीत का लावता, त्यातल्या बहुतांश जनांनी आपल्या पाट्या सुंदर मराठीत करुन घेतल्या त्यांच्या दुकानात येणा-या ग्राहकांची संख्या वाढली. त्यांचेही समाधान झाले मलाही मराठी साठी काहीतरी केल्याचे समाधान मिळाले.

आपले नेतेही दिल्लीत गेल्यावर हिंदीतुन, ईंग्रजीतुन किंवा इंग्रजाळलेल्या मराठीतुन बोलताना दिसतात ते महाराष्ट्रात परत आल्यावर सुध्दा त्याचेच अनुकरण करतात, त्यांनी दिल्लीतच काय संसदेत सुध्दा मराठीत बोलले पाहीजे म्हणजे मराठी माणसांचा उत्साह आणखी वाढेल. 
   
मराठी स्पर्धा जागतीक दर्जा मिळालेल्या ईंग्रजी शी नाही ज्यांना मराठी समजतच नाही त्यांच्यापाशी कितीही डोके फोडले तरी काय उपयोग आहे त्यासाठी मराठी भाषेला जागतीक दर्जा प्राप्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणवर प्रयत्न होणे आवश्यक आहे, आधी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांनी मराठीतुनच बोलायला पाहीजे , ब-याच शहरात मराठी माणुसच एकमेकांशी हिंदीतुन, ईंग्रजीतुन किंवा इंग्रजाळलेल्या मराठीतुन बोलताना दिसतात हे चित्र बदलले पाहीजे.

मराठी संकेतस्थळांमुळे सध्यातरी मराठीला चांगले दिवस आल्यासारखे वाटत आहेत, आंतरजालावर मराठी जनांची संख्या झपाट्याने वाढते आहे आणि या चळवळीतुनच मराठी भाषेला जागतीक दर्जा प्राप्त होणार हे निश्चीत.       

1 comment:

  1. "येक म्हणजी मर्‍हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
    ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।

    लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
    ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी। तैसी भाषा प्राकृत।।"

    ReplyDelete