Wednesday, October 27, 2010

ठाक-यांच्या भांडणाचा लाभ कोणाला ?

कल्याण-डोंबीवली महानगरपालीकेची निवडणूकीत शिवसेना आणि मनसे आमनेसामने आले आहेत, त्यांच्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. शिवसेनेने शिवाजी पार्कवरीय सभा शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थीत घेतली, त्यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबीवली त घेतलेल्या सभालाही मोठ्या संख्येने कल्याण-डोंबीवली करांनी उपस्थीती लावली. तेथील सभेत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर व त्यातली त्यात शिवसेनाप्रमुखांवर ज्या पध्द्तीने आरोप केले त्याने मात्र शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. त्याला  शिवसेनाप्रमुखांनी सामना मध्ये ठाकरी शैलीने ज्या पध्द्तीने प्रत्युत्तर दिले ते पाहुन हे मतभेद वाढतील अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणात कॉग्रेस मात्र आपला फायदा करुन घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. मनसे ने उत्तर भारतीयांविरोधात केलेले आंदोलन, मागील ४५ वर्षापासुन मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेनेने तयार केले वातावरण याला दोघातील अंतर्गत भांडणामुळे छेद जाईल आणि मराठी मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होवुन शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांनाही त्याचा फटका बसेल. राष्ट्र्वादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्रीय कॉग्रेस हेही या निवडणूकीत आपल्या पुर्ण सामर्थ्यानिशी या निवड्णूकीत उअरले आहेत आणि त्यांना या  निवड्णूकीत नक्कीच चांगले यश मिळेल अशी चिन्हे आहेत. काय होईल ते येणारा काळच ठरवेल.  

No comments:

Post a Comment