Monday, October 3, 2016

कबूतर आणि धमकी

(पंतप्रधान मोदींना पाकीस्तानची कबुतरामार्फत युध्दाची धमकी या बातमीचा आधार घेवुन )


आत्तापर्यंत शांततेच प्रतीक म्हणून 
आकाशात कबूतरे सोडली जायची 
शांततेचा संदेश देवून ती 
आकाशात दिसेनाशी व्हायची 

युधाचा उन्माद इतका की 
त्यांनी बिचाऱ्या कबूतरालाही फसवलं 
शतकानुशतके प्रेमाचा आणि शांततेचा 
संदेश देणाऱ्या कबूतरालाही अखेर 
अतिरेक्यांच्या रांगेत बसवलं..,

ॲड. अमोल देशमुख 
माजलगाव 
9028574285

No comments:

Post a Comment