Sunday, January 23, 2011

२६ जानेवारी वा १५ ऑगष्ट ला आपण काय करता ???

आपण स्वतंत्र भारताचे नागरीक, आपण २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि १५ ऑगष्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

आपण त्या दिवशी काय करतो, कारण ते आपले राष्ट्रीय सण आहेत. आपण शाळेत असताना या दोन्ही दिवशी फार उत्साहात असायचो, एक दिवस आधी आपण त्याची तयारी करायचो, शाळेच्या गणवेश तयार करणे, बुटपॉलीश करणे वगैरे तयारी करायचो आणि त्यादिवशी उत्साहाने सकाळीच शाळेत जायचो, झेंडावंदनाला आभिमानाने उपस्थीत रहायचो, प्रभातफेरीमध्ये सहभागी होवुन "एक रुपया चांदीचा, भारत देश गांधीचा", "एक दोन तिन चार, भारतमातेचा जयजयकार" अशा घोषना द्यायचो, त्या दिवशी देशपेमात न्हाहुन निघायचो, पण आत्ता मोठ्ठे झाल्यावर आपण त्या दिवशी नेमके काय करतो ?

नोकरदार वर्ग त्यांच्या कार्यालयात झेंडावंदनाला जातात पण इतर नागरीक झेंडावंदनाला जातात का ? ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सार्वजनीक झेंडावंदन होते तेथे आपण उपस्थीत राहतो का ? शाळा, महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर किती जण न चुकता झेंडावंदनाला उपस्थीत असतात ?

आपण त्या दिवशी हे मात्र करु शकतो, झेंडावंदनाला उपस्थीत राहु शकतो, प्लास्टीकचे झेंडे वापरला बंदी असताना देखील ते झेंडे सर्रास विकायला येतात, लहान मुले ते विकत घेतात, परंतु काही वेळा ते रस्त्यावर टाकुन देतात, असे रस्त्यावर पडलेले झेंडे आपण गोळा करु शकतो, त्यामुळे झेंडे पायदळी तुडवले जाणार नाहीत ,झेंड्यांचा होणारा अपमान तरी टळेल.

वर्षभर नाही तरी १५ ऑगष्ट, २६ जानेवारी, १ मे यादिवशी आपल्या देशभक्तीला उधान आलेले असते, यावेळी किमान एवढे जरी केले तरी आपल्याला समाधान लाभेल असे वाटते .

Friday, January 14, 2011

पानिपत च्या शौर्यगाथेला २५० वर्षे पुर्ण झाली....

(पानिपत रणसंग्रामातील विर योध्द्यांना मानाचा मुजरा...........)

इ.स.१७६१ साली झालेल्या पानिपतच्या युध्दाला १४ जानेवारी २०११ रोजी २५० वर्षे पुर्ण होत आहेत. पानिपतचे युध्द हे मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्चाचे पान आहे. पानिपतच्या युध्दात पराभव जरी पत्कारावा असला तरी ती मराठ्यांच्या इतिहासातील एक शौर्यगाथा होती. ती लढाई जिंकली असती तर
त्यावेळी मराठी सत्ता महासत्ता म्हणुन उदयास आली असती.

पानिपत लढाईमध्ये सहभागी हजारो मराठी सरदारांना आपले प्राण गमवावे लागले. पराभव परंतु प्रेरक अशी ही जगाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना आहे.

पानिपतच्या युध्दात हार पत्करुन सुध्दा मराठ्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातुन धडा घेवुन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करु शकला नाही हा त्या लढाईतील पराक्रमाचा इतिहास आहे.

१४ जानेवारी २०११ रोजी पानिपत रणसंग्रामास २५० वर्षे पुर्ण झाली पानिपतच्या रणांगणात धारातिर्थी पडलेल्या विरांचे रक्त आणि २६/११ च्या पाकीस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिका-यांचे रक्त हे शुर विरांनी आपल्या देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी सांडलेले रक्त होते. त्यांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, आज आपण त्यांच्या या बलीदानाची जाणीव ठेवुन आपण आपल्या देशासाठी काय करु शकतो याचा विचार करुन तो विचार आमलात आणला पाहीजे तर त्या सर्व विरांना खरी श्रध्दांजली ठरेल........

पानिपत लढाईमध्ये शहीद झालेल्या हजारो विरांना मानाचा मुजरा......

Thursday, December 30, 2010

लाखाचा असो वा कोटीचा, तुमचे आमचे सेम असतं..........

आदर्श म्हणॆ लवासाला
तु किती लाखाचा
तर टु-जी म्हणे सी.डब्ल्यु.जी ला
तु किती कोटीचा
एक घोटाळा म्हणे दुस-याला
काडीने खाल्ले काय अन
हाताने खाल्ले काय
शेण म्हणजे शेण असते
लाखाचा असो वा कोटीचा
तुमचे आमचे सेम असते


अनंत घोटाळ्यांनी गाजलेल्या सरत्या वर्षाला निरोप देताना खरव आनंद होतो आहे, २०१० हे वर्षच मुळी महाघोटाळ्यांचे वर्ष म्हणुन गणले जाते की काय इतके मोठे घोटाळे या सरत्या वर्षात झाले. कॉमनवेल्थ घोटाळा काय अव टु-जी स्पेक्ट्र्म घोटाळा काय यांनी मागील सर्व घोटाळ्यांचे विक्रम मोडीस काढले, भारताचा अर्थव्यवस्था खिळखीळी होती की काय अशी परीस्थीती या घोटाळ्यांनी निर्माण केली. या घोटाळ्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागले, दोन केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई झाली, एखाद्या क्रिकेट्पटुने खेळताना नवनवे उच्चांक प्रस्थापीत करावेत तसे नेत्यांनी नवनवीन घोटाळ्यांचे उच्चांक प्रस्थापीत केले.

सरत्या वर्षात महागाईने उच्चांक गाठला, पेट्रोलच्या भावात तब्बल सहा वेळा वाढ झाली, सामान्य माणसाचा जीव या महागाईत होरपळुन निघाला, कांद्याने सामान्य माणसाबरोबर सरकारच्या ही डोळ्यात पाणी आणले, सततच्या पावसाने शेतीमालावर खुप परिणाम झाला,

काही चांगले झाले असेलही परंतु २०१० ने जनतेला महागाई, भ्रष्टाचार आणि त्रास हेच जास्त प्रमाणात दिले.

Thursday, December 23, 2010

साहित्य संमेलन का उधळवता ?

तब्बल २२ वर्षांनी ठाण्यामध्ये अखिल भारतीय साहीत्य संमेलन होत आहे, ठाणेकरांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे. ठाणेकरांनीही त्याची जोरदार तयारी केली आहे, संमेलनाच्या संयोजकांनी साहीत्य संमेलनातील मंचाना, प्रवेशव्दारांना  थोर साहीत्यीकांची नांवे दिलेली आहे, त्यात सावरकरांपासुन ते शाहीर विठ्ठ्ल उमाप यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे, असे हे सर्वसमावेशक संमेलन काही विषीष्ट जातीयवादी संघटनानी केवळ क्रिडा संकुलाच्या नावावरुन संमेलन उधळवुन लावु अशी धमकी दिली आहे. संमेलनाचा आणि क्रिडा संकुलाच्या नावाचा काहीही संबंध नाही परंतु ही धमकी केवळ सवंग प्रसीध्दी मिळवण्यासाठी दिली गेली की काय अशी शंका येते.

साहीत्य संमेलनात विचारांचे मंथन होते, तेथे विचारांचा सामना विचारांनी केला पाहीजे, विचारांचा सामना झुंडशाहीने करुन काय साध्य होणार आहे. हे संमेलन केवळ उच्चवर्णीयांचे आहे, त्याला आम्ही विरोध करणारच हे हास्यास्पद वाटते, आधुनिक महाराष्ट्रात जातीने कोणी उच्चवर्णीय ठरत नाही, त्याची वैचारीक पातळी उच्च असायला हवी, सर्वच जातीमध्ये चांगल्या आणि उच्च विचारांचे साहीत्यिक आणि विचारवंत आहेत, त्यामुळे केवळ जातीय राजकारणातुन असे हास्यास्पद आरोप कोणीच करायला नकोत. जशी राजकारण ही केवळ कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही तशीच साहीत्य ही सुध्दा कोणत्या विशीष्ट जातीची मक्तेदारी राहीलेली नाही, राजकारणामध्ये दर्जा महत्वाचा मानला जात नाही परंतु आजही साहीत्यामध्ये "दर्जेदार साहीत्य" हा प्रकार अस्तीत्वामध्ये आहेच. आणि दर्जेदार साहीत्य हे समाजाकडुन आजही स्विकारले जाते, त्यावेळी साहीत्यीकाची जात पाहीली जात नाही. साहीत्य संमेलन उधळवुन लावु  या झुंडशाहीचा सर्वस्तरातुनच निषेध होईल.    

Sunday, December 19, 2010

शतकांचे "अर्धशतक" करणारा जिगरबाज "सचिन"

गेली तब्बल २१ वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये तळपणारा तेजस्वी तारा म्हणजे जिगरबाज "सचिन"...
शतकामागुन शतके आणि विक्रमामागुन विक्रम करणारा जिगरबाज "सचिन"
टिकाकारांनी कितीही टिका केल्या तरी विचलीत न होता त्यांना आपल्या बॅटनेच उत्तर देणारा जिगरबाज "सचिन"
मॅच फिक्सींग च्या वादळापासुन दुर असणारा जिगरबाज "सचिन"
२१ वर्षे अत्यंत संयमाने बॉलवरील नजर न ढळु देता बॅट आणि बॉलशी अद्वैत साधलेला जिगरबाज "सचिन"
मागील २१ वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये कितीही वादळे आली परंतु त्यातही धिरोदत्तपणे पाय रोवुन उभा राहीलेला  जिगरबाज "सचिन"
१९८९ साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पाकीस्तानच्या ईम्रान,अक्रम आणि वकार चा यशस्वीपणे सामना केला आणि आपल्या करकिर्दीची सुरुवात करुन आजतागायत वयाच्या ३७ पर्यंत सर्वांच्याच गळ्यातला ताईत बनलेला  जिगरबाज "सचिन"
आजही क्रिकेटवरील तिच निष्ठा,तिच जिगर,बॉलवरील तिच नजर, बॅटवरिल तिच पकड, अडचणीच्या काळातही पाय रोवुन उभे राहण्याची तिच जिगर, भारतीय क्रिकेटमधील मुकुटमणी, कोहीनुर हिरा म्हणजेच  जिगरबाज "सचिन"
आजही सामना चालु असताना "सचिन आहे का रे ?’ असे विचारत तो खेळत असला तर हातातली कितीही महत्वाची कामे सोडुन त्याचा खेळ बघणारा भारतीय प्रेक्षक आणि सचिन यांचे नाते काही औरच...


त्या क्रिकेटच्या ख-याखु-या नायकाला मानाचा मुजरा...........................  
 

Saturday, December 18, 2010

संगणकाच्या "उंदराचा" सांगाडा, अन मजेशीर चित्रे...




आपण सर्वजन रोजच संगणकाच्या सातत्याने संपर्कात असतो, माऊस तर आपला जीवलग, त्याची मजेशीर कार्टुन्स मला आंतरजालावर सापडली, आपल्याला आवडली तर बघा..

Sunday, December 12, 2010

मनोगत मेलेल्या "मी" चे...

मरणामुळे सरणावर गेलो
सरणाचे आम्हा नवल नव्ह्ते
जीवंतपणी रोजचेच तसे
सरणावर जळणे होते
जीवंत होतो मी परंतु
जगण्यासारखे काय होते
धावत होतो मी परंतु
मिळणार मज काय होते
मी असा मी तसा हे माझे ते माझॆ
रोज रोज हे माझॆ सांगणे होते
मेल्यानंतर मला उमगले
जगात आपले काहीच नव्ह्ते
जीवंतपणी माझॆ "मी" पण
मला रोज छ्ळत होते
मेल्यानंतर खरेतर माझा देह नव्हे
माझॆ मीपण जळत होते