Monday, November 22, 2010

माणसं देवासारखी अचानक भेटतात तेव्हा...

आम्ही मित्रमंडळी आपल्या काही कामानिमीत्त नुकतेच मुंबई ला गेलो होतो. आम्ही यापुर्वीही मुंबई ला गेलेलो परंतू ते रेल्वेने किंवा बसने, पण या वेळेस स्वत:ची गाडी घेवुन गेल्यामुळे मुंबई मध्ये रस्ते सापडतील का या विचारात वाशी पर्यंत आम्ही विनासायास पोहोचलो, त्यानंतर आमचे काही मित्र तेथे उतरले, आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे असल्यामुळे त्यांनी सांगीतले सरळ या रस्त्याने जा चेंबुर लागेल आणि पुढे विचारत विचारत जा, तास दोन तासात तुम्ही तेथे पोहोंचाल, आम्ही निघालो, परंतु चेंबुर च्या बरेच पुढे गेल्यावर आम्हाला नेमका रस्ता कळेना, एका सिग्नल ला आमची गाडी थांबली आजुबाजुला ब-याच गाड्या येवून थांबल्या पैकी एका गाडीचा चालक सारखा आमच्याकडे पहात असल्याचे आमच्या लक्षात आले, शेवटी त्याने आम्हास बीड चे का असे विचारले आम्ही त्यास तुम्ही कोठे असता वगैरे विचारले असता त्याने मीही बीडचाच असे सांगुन कोठे जायचे आहे असे विचारले आम्ही छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला जायचे आहे असे सांगताच त्याने मझ्या मागोमाग या असे सांगुन त्याची गाडी पुढे घेतली, आम्ही ब-याच प्रमाणात चिंतामुक्त झालो, साधारणपणे अर्धा तासात त्याने आम्हाला छ्त्रपती शिवाजी टर्मीनस ला नेवुन पोहोचवले आम्ही आनंदीत झालो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे आभार मानण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही कारण अनेक वाहनांच्या गर्दीत तो कुठे नाहीसा झाला हे काही आम्हाला कळाले नाही आम्ही दिवसभर आमच्या कामात व्यस्त राहीलो परंतू त्या अज्ञात मदतगाराचे साधे आभारही मानु शकलो नाही याची दिवसभर हुरहुर लागुन राहीली, एखाद्या कठीण प्रसंगात अशी माणसं देवासारखी अचानक येतात आणि आपल्याला मदत करुन निघुन जातात तेव्हा खरा माणूसकीचा प्रत्यय येतो, आपण त्यांचे साधे आभारही मानु शकत नाहीत किंवा त्यांना काहीच देवू शकत नाहीत तेव्हा खुप कसेतरी वाटते, जगात दिशाभुल करणारी माणसेही खुप भेटतात परंतू योग्य दिशा दाखवून मदत करणारी माणसे तशी अभावाने भेटतात त्या अज्ञात मदतगाराचे मनापासुन आभार फक्त या माध्यमातुन मांडणेच आपल्या हातात आहे, यानंतर मी मात्र एवढेच करु शकतो की मीही कधीतरी अशीच कोणाला तरी त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करुन त्या अज्ञात मदतगाराचे रुण फेडू शकेल एवढेच... 

No comments:

Post a Comment