Saturday, August 21, 2010

खासदारांची पगारवढ

खासदारांना दिला पगारवाढीचा मलिदा
आता ते खातील तुपाशी,
गरीब शेतक-यांच्या देशात मात्र
शेतकरीच मरतील उपाशी.
त्यांना झाली आहे भरघोस पगारवाढ
तरी ते संसदेत झोपा काढणार
जनतेचे प्रश्न तसेच राहतील
तेच मात्र आणखी सवलती मागणार
मग त्यांच्यावर सवलतींचा पाऊस पडेल
कारण तेच आता पृथ्वीवरील इंद्र
जनता मात्र पहात राहील आभाळाकडे
आणी वेड्यासारखे शोधत राहील अमावस्येचा चंद्र..

2 comments:

  1. कविता आवडली, तुमचे मुद्दे बरोबर आहेत. आणि दिलेल्या उपमा सुद्धा झकास आहेत!

    ReplyDelete
  2. सुंदर. कविता आवडली...!

    ReplyDelete