Friday, September 10, 2010

वादग्रस्त लिखाण करुन ब्लॉग वाचकप्रीय बनवता येत नाही...

सध्या मराठी ब्लॉग ची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. ब्लॉगवर कवीता, लेख, ललीत, गड किल्ल्यांची माहीती ,सामाजीक, चिंतनीय,विनोदी, किंवा समाज उपयोगी साहीत्य ब-याच प्रमाणात लिहीले जाते अशा ब्लॉग ना मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग मिळतो आणि अशा ब्लॉग ना भेट देवुन चांगल्या लेखांना, कवितांना वाचुन आपले अभिप्राय नोंदवता येतात परंतु आजकाल काही माथेफीरु, स्वयंघोषीत विद्वान आपल्या ब्लॉगमधुन वादग्रस्त लिखान करुन वाचकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला फारसे कष्ट पडत नाहीत पण आपली लेखणी अशांसाठी का झीजवायाची, अशा माथेफीरुंना उत्तर म्हणजे त्यांच्या ब्लॉगकडे दुर्लक्ष करणे, त्यांना फारशी किंमत न देणे. बर हे स्वयंघोषीत विद्वान थोर इतिहासकार, इतिहासातील थोर सेनानी ज्यांना जगमान्यता लाभलेली आहे, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुर्णच होवु शकत नाही अशा जेष्ठ विभुंतींबद्दल अपशब्द वापरुन स्वत:ला प्रसीध्दी मिळवण्याचा प्रयत्न करताना वारंवार दिसतात, मराठीसुची संकेतस्थळावर असाच एक "बी" ग्रेड किंवा "सी" ग्रेड लेखाचे फक्त शिर्षक माझ्या पाहण्यात आले अशा लोकांना उत्तरेच देवु नयेत त्यांचा माथेफिरुपणा कमी होईल.

1 comment:

  1. आपल्या मताशी मी १०० % सहमत आहे तथापि आपली काही श्रद्धा स्थाने अति घाणेरड्या पद्धतीने भ्रष्ट होताना पाहवत नाही नि फक्त केवळ त्या मुळे त्या प्रतिक्रिया नाईलाजास्तव दिल्या जातात.बरे त्या आधी मॉडरेशनला जाणार आहेत का हे पोस्ट करे पर्यंत ठाऊक नसते त्या मुळे तर आपली सर्व मेहनत वाया गेल्या सारखे वाटते नि आपण काही एक कारण नसताना अजून पस्तावतो.असो.

    ReplyDelete