Monday, November 29, 2010

जगमोगन रेड्डी नी "घराणेशाही" साठी "भुकंप" घडवला ?

राजकारणात घराणेशाही अनादी कालापासुन चालु आहे, आणि आजच्या राजकीय परीस्थीमध्ये ती राजकीय नेत्यांची अपरीहार्यता बनली आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांना मात्र ती काही प्रमाणात अडचणीची ही ठरत आहे, प्रत्येक राजकीय नेत्याचा वारसदार राजकीय दृष्ट्या परीपक्वच असतो असे नाही, त्याला गादीवर बसवल्यामुळे खुप मोठे राजकीय नुकसान त्या पक्षास सोसावे लागत असेल तर अशा वेळी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न पक्षप्रमुखाला पडतो आणि वारसदाराच्या विरोधात निर्णय गेल्यास पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार सध्या आंध्र प्रदेशात चालु आहे. आंध्र चे मुख्यमंत्री वाय.एस.आर .यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी म्हणुन त्यांचे पुत्र जगमोगन रेड्डी यांनी खुप प्रयत्न केले  परंतू कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलून रोसय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, वास्तविक पाहता अनुकंपा म्हणून जगमोगन रेड्डी यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी लोकभावना होती परंतु कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी त्यांना डावलले, जगमोगन रेड्डी यांनी त्यावेळी टोकाचा निर्णय घेतला नाही पण के.रोसय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉग्रेस पक्षश्रेष्टींनी किरणकुमार यांना मुख्यमंत्रीदी बसवताच जगमोगन रेड्डी यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि टोकाचा निर्णय घेत  आपल्या कासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवुन दिला व आंध्र मध्ये खळबळ उडवुन दिली. महाराष्ट्रात शरद पवारांनी याच मार्गाने जावुन वेगळा पक्ष स्थापन केला व चांगले यश मिळवुन कॉग्रेस ला वठणीवर आणले तसे करण्याचा जगमोगन रेड्डी यांचा प्रयत्न असेल तर त्याला कसा प्रतीसाद मिळतो हे येणारा काळच ठरवेल.

2 comments:

  1. जगनमोहनचे स्वत:चे असे काही एक कर्तुत्व नाहि. जे आहे ते बापाच्या नावाने. खुर्ची मागितली ते कर्तुत्व गाजवुन नाही, तर माझे वडिल मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असताना ते गेले, तर त्यांच्या जागी मला बसवा. जणु काही अनुकंपा तत्वावर नोकरी आहे.

    ReplyDelete
  2. खरचं, आपलं म्हणन मला पटलं, मुख्यमंत्रीपद हे अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाराखे पद नाही. परंतु भारतीय राजकारणात ही गोष्ट सर्रास चालते. त्याची अनेक उदाहरणे आहेत. धन्यवाद.

    ReplyDelete