Tuesday, September 21, 2010

११० वर्षाचा नवसाला पावणारा टेंबे गणपती...

महाराष्ट्रात १०० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची परंपरा असनारे जे मोजके गणपती आहेत त्यामध्ये माजलगांव जि.बीड (मराठवाडा) येथील नवसाला पावणारा धुंडीराज टेंबे गणपती प्रसिध्द आहे. ११० वर्षाची ऐतिहासीक परंपरा असलेला टेंबे गणपती गणेश चतुर्थीला स्थापन न होता भाद्रपद शुध्द एकदशीला स्थापीत होतो व त्याचे विसर्जन देखील अनंत चतुर्द्शीला न होता प्रतीपदेला होते. असे का ,त्याची परंपरा अशी का पडली त्याला संघर्षाचा इतिहास आहे. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते, मराठ्वाडात इंग्रजाचा मांड्लीक निजाम याची राजवट होती, त्यावेळी टेंबे गणेशाची मिरवणुक काही समाजकंटकांनी अडवली होती, त्यामुळे त्याजागेवरच गणपतीची मुर्ती ठेवुन टेंबे गणेशाच्या संस्थापक ब्राम्हण मंडळींनी हैद्राबादच्या निजामाकडे जावुन त्याच्याकडुन ताम्रपत्रावर परवानागी आणली व त्यानंतर वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली, त्यामुळे आजतागायत टेंबे गणेशाची भाद्रपद शुध्द एकदशीला स्थापना होते व विसर्जन  प्रतीपदेला होते. त्याकाळी नवसाची पुर्ती होण्यासाठी भाविक भक्त हाती मिरवणुकीत टेंबा धरत, त्यांचे नवस पुर्ण होत ती परंपरा आजही कायम आहे, या नवसाच्या टेंब्यामुळेच या गणपतीचे नांव टेंबे गणपती पडले. नवसाला पावाणारा टेंबे गणपती म्हणुन या गणपतीची किर्ती आज उभ्या महाराष्ट्र्भर पसरलेली आहे, या टेबे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन गणेशभक्तांची रीघ लागलेली असते. या गणेशाची ७ ते ८ फुटी मुर्ती येथील मुर्तीकार गोंदीकर हे  स्वत: तयार करतात. सर्व गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर टेंबे गणेशाचे विसर्जन असल्यामुळे टेंबे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वच जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने सामील होतात. अशा ११० वर्षाचा नवसाला पावाणारा  टेंबे गणपतीचे दर्शन घ्यायला आपण एकवेळ जरुर  यावे...
  

Sunday, September 19, 2010

रस्त्यावर होल मग नो टोल

रस्त्यावर जर खड्डे पड्ले असतील तर टोल देवु नका असा तोंडी आदेश सरकारमधील जबाबदार, लोकप्रीय गृहमंत्र्यांनी दिल्यामुळे वाहनधारंकांना आनंद झाला. मागील १० ते १५ वर्षापासुन महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महामार्गांवर असे टोलनाके वाहनधारंकांचे खिसा कापित होते. टोल वसुलीची मुदत संपल्यानंतर सुध्दा हे ’टोळ’ टोल वसुली करत होते. बहुतेक टोलनाके राजकीय नेत्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी किंवा गुंड पाळु शकणा-या धनदांडग्यांनी चालवायला घेतलेले होते त्यामुळे प्रेमाने कमी आणि सक्तीने जास्त यापध्द्तीने वाहनधारंकांकडुन टोलवसुली केली जात होती. प्रवासाला निघताना पेट्रोल, डिझेल नंतर टोल लाच पैसे मोठ्या प्रमाणावर लागायचे. टोल वसुलीची मुदत संपल्यानंतर सुध्दा टोल घेणा-या टोलधारकांच्या विरोधात अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा संबधीत खात्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे मागील १० ते १५ वर्षात कधी घडले नाही. ईंग्रजांच्या काळात अशी सक्तीने करवसुली चालायची, त्यावेळी कर चुकवना-यांना ईग्रज अधिकारी चाबकाने फोडून काढायचे आता टोल नावाचा कर एखाद्याने चुकवायचा प्रयत्न केल्यास काय घड्ते याचा अनुभव न घेतलेलाच बरा.   
"बी.ओ.टी." (बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा)    या संकल्पनेतुन अनेक पुल आणि रस्ते बांधण्यात आले. मात्र बांधकाम खात्याने त्यांच्या गुणवत्तेकडे सर्रास दुर्लक्ष केले त्यामुळे वर्षाच्या आतच या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पड्ले. वाहनधारक अशा रस्त्यांवर खड्ड्यांमधुन मार्ग काढत टोल नाक्यावर टोल भरायचे, काहीजन तक्रार करायचे परंतु अशा तक्रारींना केराची टोपली दाखवली जायची.
सध्या तर "बी.ओ.टी."  तत्वावर अनेक रस्ते, पुल यांना मंजुरी दिली जात आहे, खाजगीकरणातुन असे रस्ते बांधले जात असल्यामुळे त्यांच्या दर्जाकडे पुर्णत: दुर्लक्ष करण्यात येते (काही अपवाद वगळता) आणि असे रस्ते लवकर खराब होतात, मात्र त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करुन संबधीत कंपनी टोल वसुल करण्याचे काम मात्र हक्काने करते. आता जनतेतुन याला विरोध होत आहे, मनसे ने आपल्या स्टाईलने असाच एक टोलनाका बंद पांडल्याचे नुकतेच वाचनात आले, आता गृहमंत्र्यांनी "रस्त्यावर होल मग नो टोल" हा नारा दिल्यामुळे तरी रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करायला काय हरकत आहे. गृहमंत्र्यांच्या या आदेशाचे सरकारने मनावर घेतले आणि तसा निर्णय जाहीर करुन जनतेला दिलासा दिला तर तो सुदिन म्हणावा लागेल.

Thursday, September 16, 2010

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...

१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदिर्घ लढ्यानंतर हैदराबाद  मुक्ति संग्रामाची परिणती १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासना विरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावुन घेतेले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला.१ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद राज्या चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.स्वामी रामानंदतीर्थ,गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्राम चे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंदतीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते.  स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले.
मराठ्वाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्रविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्रविरांना मानाचा मुजरा.
सर्व मराठ्वाडा वासीयांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा...

Tuesday, September 14, 2010

सल्लुमियाचा बालीशपणा..

२६/११ चा मुंबई वरील दहशदवादी हल्ला हा श्रीमंतांवर झालेला हल्ला होता म्हणुन त्याचा अधिक बोलबाला झाला, त्या अतिरेकी हल्ल्यात शेजारच्या देशाचा हात नव्हता अशी मुक्ताफळे सल्लुमियाने उधळली,  बालीश वक्तव्ये करुन प्रसिध्दी मिळवण्याचा स्टंट सल्लुमियाच्या चांगलाच अंगलट आला, अशी विधाने करुन त्याला काय साधायचे होते हे त्याचे त्यालाच माहीत. कदाचित वादग्रस्त विधान करुन चर्चेत येवुन त्याच्या दबंग ला प्रसीध्दी मिळवुन देण्याचा त्याचा प्रयत्न असावा, तसे असेल तर तो प्रयत्न फसला असेच म्हणावे लागेल.
    मुंबई मध्ये ताज,ओबेराय वर हल्ला झाला तेथे फक्त श्रीमंताचेच वास्तव्य असते असे त्याचे म्हणने होते परंतु त्याचवेळी जे.जे. हॉस्पीटल, कामा हॉस्पीटल, सी.एस.टी. येथेही दहशदवाद्यांनी हल्ला करुन मोठ्या संख्येने निश्पाप नागरिकांना मारले हे सल्लुमिया विसरला आणि बेलगाम वक्तव्य करुन गेला. असे विधान करुन सलमान खान ने मात्र आपले हसे करुन घेतले. सरकारने त्याच्या या वक्तव्याची गांर्भीयाने दखल घेवुन त्याला फटकारायला हवे होते, परंतु सलमानवर ताबडतोब सर्वबाजुंनी टीका झाल्यावर त्याने माफी मागुन या वादातुन आपली सुटका करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. काही दिवंसांपुर्वी सलमानने आपल्या गाडीखाली फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांना चिरडले होते ते गरीबच होते, त्यावेळी त्याने आपण सेलेब्रीटी असल्यामुळेच या प्रकरणाला जास्त प्रसीध्दी देण्यात आली असा कांगावा केला होता. सलमान खान ने यापुढेतरी अशी बेलगाम वक्तव्ये करु नयेत अशीच सर्वांची अपेक्षा असणार..
     

Friday, September 10, 2010

जातीयवादाची ही विषारी फळे खरचं कोणी चाखायची....

आम्ही भारतीय
आम्ही महाराष्ट्रीयन
आम्ही या मातीचे
हे सारं मागे पडलं हो..
आता
आम्ही या जातीचे
आम्ही त्या जातीचे
जातीनिहाय....
आमचे नेते वेगळे
आमचे रंग वेगळे
आमचे झेंडे वेगळे
आम्ही त्यांचा द्वेष करणार
ते आमचा द्वेष करणार
आमच्या अंगणात फुलाचे झाड नाही पण
जातीची ही विषवल्ली मात्र
आम्ही सर्वांनीच जोपासली
त्याला नेत्यांनी व्यवस्थीत खतपाणी घातले
सरकारने आधार दिला
त्याची कडु फळे मात्र चाखावी लागतील
आमच्या येणा-या पिढीला
आम्ही त्यांना काय देतोय
सुरक्षीत भविष्य का
जातीची ही विषारी फळे..
खरच विचार करा

वादग्रस्त लिखाण करुन ब्लॉग वाचकप्रीय बनवता येत नाही...

सध्या मराठी ब्लॉग ची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. ब्लॉगवर कवीता, लेख, ललीत, गड किल्ल्यांची माहीती ,सामाजीक, चिंतनीय,विनोदी, किंवा समाज उपयोगी साहीत्य ब-याच प्रमाणात लिहीले जाते अशा ब्लॉग ना मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग मिळतो आणि अशा ब्लॉग ना भेट देवुन चांगल्या लेखांना, कवितांना वाचुन आपले अभिप्राय नोंदवता येतात परंतु आजकाल काही माथेफीरु, स्वयंघोषीत विद्वान आपल्या ब्लॉगमधुन वादग्रस्त लिखान करुन वाचकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला फारसे कष्ट पडत नाहीत पण आपली लेखणी अशांसाठी का झीजवायाची, अशा माथेफीरुंना उत्तर म्हणजे त्यांच्या ब्लॉगकडे दुर्लक्ष करणे, त्यांना फारशी किंमत न देणे. बर हे स्वयंघोषीत विद्वान थोर इतिहासकार, इतिहासातील थोर सेनानी ज्यांना जगमान्यता लाभलेली आहे, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुर्णच होवु शकत नाही अशा जेष्ठ विभुंतींबद्दल अपशब्द वापरुन स्वत:ला प्रसीध्दी मिळवण्याचा प्रयत्न करताना वारंवार दिसतात, मराठीसुची संकेतस्थळावर असाच एक "बी" ग्रेड किंवा "सी" ग्रेड लेखाचे फक्त शिर्षक माझ्या पाहण्यात आले अशा लोकांना उत्तरेच देवु नयेत त्यांचा माथेफिरुपणा कमी होईल.

Tuesday, September 7, 2010

एस.एम.एस. संग्रह..

दिवस ईवल्याश्या पक्षांसारखे असतात
भुर्रकन उडून जातात..
आणि मागे ठेवतात आठवणींची पिसे
काही पांढरी, काही काळी
काही मऊ काही खरखरीत
आपण जमतील तेवढी गोळा करायची
गुंफून बनवायची
एक आठवणींची चटई
जीवनाच्या संध्याकाळी
निवांत पडण्यासाठी..........