पाकीस्तानला चारीमुंड्या चित करण्याचा आनंद काय वर्णावा. काल तमाम भारतीयांच्या जीवनात सोनेरी दिवसाची नोंद झाली, तमाम भारतीयांनी पाकीस्तानला नमवुन अक्षरश: दिवाळी साजरी केली, हजारो लाखो भारतीय सामना जिंकल्यावर रस्त्यावर आले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय साजरा केला.
सामना सुरु झाल्यापासुन सामना संपेपर्यंत सामन्याचा एक एक चेंडु डोळ्याची पापणी न लवु देता पाहणार्या भारतीय प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटले. कोण खेळले कोण नाही याहीपेक्षा आपला पुर्ण संघ एकदिलाने खेळला आणि अटितटीच्या लढतीत पाकड्यांना हरवुन सामना जिंकुन तमाम भारतीयांनी पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
सचिन दा परत एकदा तळपला, त्याचे शतक १५ धावांनी हुकले हीच काय ती हुरहुर कायम राहीली परंतु त्याच्या शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता आणि आम्ही तो मिळवलाच. आम्ही भारतीयांच्या चेहर्यावरील ओसंडुन वाहणारा आनंद बघीतला, आफ्रीदी, वकार यांना रडताना पाहीले, हताश शोएब चा चेहरा बघीतला, हाच आमला फायनल होता आणि भारतीय संघाने तो वाजतगाजत जिंकला......
आम्हाला अवर्णनिय आनंद मिळवुन देणार्या भारतीय संघाचे शतश: आभार..........
शतकापासुन वंचीत राहीला तरी जिगरबाज खेळी करणार्या सचिनचे आभार.....
तमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर !!!!